बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी ओसरली; शेतकरी अडचणीत, महागाईत मात्र वाढ
येवला : प्रतिनिधी
यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने येवला शहर व तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील पिके उद्ध्वस्त झाली असून, शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. याचा थेट परिणाम यंदाच्या दिवाळी सणावर आणि स्थानिक बाजारपेठेवर दिसून येत आहे
ऐरवी शेतकर्यांच्या खरेदीवर गजबजणारी येवल्याची बाजारपेठ यंदा पूर्णपणे मंदावली आहे. पावसाअभावी शेतकर्यांचे आर्थिक बजेट कोलमडल्यामुळे शहरात वस्तूंच्या खरेदीसाठी होणारी गर्दी नगण्य आहे. दिवाळी साजरी करायची म्हणून जेमतेम खरेदी केली जात असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. दिवाळीनिमित्त शहरात आकाशकंदील, फराळाचे पदार्थ, कपडे आणि साड्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. मात्र, खरेदीसाठी शेतकरी किंवा शहरातील नागरिकांची अपेक्षित गर्दी दिसून येत नाही. एकंदरीत, पावसाची ओढ, पिकांचे झालेले नुकसान आणि गगनाला भिडलेली महागाई यांमुळे यंदा येवला शहराच्या बाजारपेठेवर दुष्काळाचे सावट स्पष्टपणे दिसून येत आहे.
किराणा साहित्याचे दर वाढले
एकीकडे दुष्काळी परिस्थिती तर दुसरीकडे भरमसाठ वाढलेली महागाई, यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. किराणा साहित्य, खाद्यतेल आणि साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
Drought casts a shadow over Diwali in Yeola this year