मुख्यमंत्री फडणवीस : समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 चे उद्घाटन
नाशिक : प्रतिनिधी
ग्रामीण भागाचा सर्वांगीण व शाश्वात विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0’अंतर्गत पाण्याचा प्रत्येक थेंब साठविणे, तलावांतील गाळ काढणे, बंधार्यांची दुरुस्ती आणि जलसंधारणाच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे केले. या कामांसाठी राज्य शासन आवश्यक तो संपूर्ण निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाहीही त्यांनी याप्रसंगी दिली.
ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या वतीने नाशिक येथील यूथ फेस्टिव्हल मैदानावर ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान लोकप्रतिनिधींचा महाकुंभ’, अभियान 2025-26 च्या पुरस्कारांचे वितरण, अभियान 2.0 (2026-27) चा शुभारंभ आणि ‘सरपंच परिसंवाद- दुष्काळावर मात आणि समृद्ध गावाचा संकल्प’ या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या महाकुंभास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, ग्रामविकास व पंचायतराजमंत्री जयकुमार गोरे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह खासदार भास्कर भगरे, आमदार गोकुळ गिते आ. देवयानी फरांदे, आ. दिलीप बनकर, आ. सरोज अहिरे, आ. नितीन पवार, आ. डॉ. राहुल आहेर, आ. दिलीप बोरसे, आ. हिरामण खोसकर, आ. राहुल ढिकले तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि हजारोच्या संख्येने सरपंच उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की , जलयुक्त शिवार अभियानाने दाखवून दिले आहे की, अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी एकत्र काम केल्यास सकारात्मक बदल घडतो. याच अनुभवावरून पंचायतराज अभियानाला मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. उत्कृष्ट कामगिरी करणार्या सर्व संस्थांचे अभिनंदन करत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की, त्या स्वतः पुरस्कारप्राप्त व अंतिम 12 ग्रामपंचायतींना भेट देऊन तेथील विकासकामांची पाहणी करतील.
सुरुवातीची अतिवृष्टी आणि त्यानंतर पावसाने दिलेल्या ओढीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांत 12 प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. रब्बी हंगामासाठी पाणी राखून ठेवणे, गाळ काढणे, बंधारे दुरुस्त करणे आणि ’जलतारा’ संरचना उभारण्यावर भर दिला जावा. विविध योजनांचे अभिसरण करून जलसंधारणाची कामे केली जातील, ज्यामुळे पाणीसाठा वाढण्यासोबतच ग्रामीण मजुरांना रोजगार मिळेल. दुष्काळात शेतकर्यांनी पशुधन विकू नये यासाठी चार्याची सोय करण्याचे नियोजन केले जात आहे. दुष्काळात कोणताही नागरिक उपाशी राहणार नाही. पात्र शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य आणि शेतकर्यांना निकषांच्या पलीकडे जाऊन सर्वतोपरी मदत केली जाईल.
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि यशदाचे उपसंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी जलतारा तज्ज्ञ प्रा. डॉ. पुरुषोत्तम वायाळ आणि ज्येष्ठ जलसंधारण कार्यकर्ते पद्मश्री पोपटराव पवार यांनी जलसंधारणाबाबत मार्गदर्शन केले. ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रास्ताविकात अभियानाची उद्दिष्टे व दुसर्या टप्प्यातील नियोजनाची माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांची पोलीस विभागाविषयी तक्रार :
ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या पुरस्कार वितरण प्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पोलीस विभागावर विषयी माझी तक्रार आहे , असे म्हणताच सर्वांच्या भुवया उंचावल्या आणि अनेकांनाआश्चर्याचा धक्का बसला. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून लाखोचा जनसमुदाय जमला होता , मात्र कार्यक्रम स्थळी व्यासपीठ आणि प्रेक्षक यांच्यामध्ये प्रचंड मोठे अंतर होते. सुरक्षेच्या कारणास्तव हे अंतर ठेवण्यात आले , याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पोलीस विभागाविषयी नाराजी व्यक्त करीत इतके अंतर का ठेवले ते आमचे लोक आहेत , ते आमच्या जवळ पाहिजे असे म्हणून या जास्त अंतराबद्दल खंत व्यक्त केली.
पहिल्या टप्प्यातील यश
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पहिल्या टप्प्यातील यशाचा आलेख मांडताना सांगितले अभियानाच्या पहिल्या टप्प्यात 5,644 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला. सुमारे 69 लाख 13 हजार आयुष्मान कार्ड तयार करण्यात आली.
2,706 किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण झाली.
घरकुल योजना, दिव्यांग कल्याण, सौरऊर्जेचा वापर, सीसीटीव्ही बसवणे, पाणंद रस्ते आणि जलपुनर्भरणाची कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली. दुसर्या टप्प्यात राज्यातील सुमारे 28 हजार ग्रामपंचायतींचा सहभाग अपेक्षित असून दुष्काळ निवारणावर विशेष भर दिला जाईल.
पुरस्कार विजेत्यांची यादी (2025-26)
अभियानात उत्कृष्ट काम करणार्या संस्थांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले , आकर्षक स्मृतीचिन्ह आणि रोख कोटी रुपयांची रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते.राज्यस्तर अनुक्रमे जिल्हा परिषद 5 कोटी ,3 कोटी , 2 कोटी
राज्यस्तर ग्रामपंचायत 5 कोटी ,3 कोटी ,2 कोटी
राज्यस्तर पंचायत समिती 2 कोटी ,1.50 कोटी , 1.25 कोटी असे होते.
1. उत्कृष्ट जिल्हा परिषद गट –
क्रमांक : जिल्हा परिषद –
प्रथम : नाशिक
द्वितीय : पुणे
तृतीय : सांगली
2. उत्कृष्ट पंचायत समिती गट –
क्रमांक : पंचायत समिती (जिल्हा)
प्रथम : नाशिक (जि. नाशिक)
द्वितीय : खालापूर (जि. रायगड)
तृतीय : राहाता (जि. अहिल्यानगर)
3. उत्कृष्ट ग्रामपंचायत गट
प्रथम: अडाचीवाडी (तालुका पुरंदर, जि. पुणे)
द्वितीय (विभागून): खामशेत (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) , लाडूद (ता. बागलाण, जि. नाशिक)
तृतीय (विभागून): उटी बु. (ता. औसा, जि. लातूर) ,
कोतवाल बर्डी (जि. नागपूर)
द्वारका सर्कल, विमानतळाच्या कामाची पाहणी
नाशिक येथील द्वारका सर्कलचे काम अत्यंत महत्त्वाचे आणि आव्हानात्मक आहे. मात्र, हे काम नियोजनबद्ध पद्धतीने वेगाने सुरू असून, निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. यंदाच्या पावसाळ्यात याठिकाणी पाणी निचर्याची चाचणी करण्यात आली आहे. पावसाचे पाणी साचणार नाही आणि निचरा सुरळीत होईल, यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यानंतर त्यांनी ओझर विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाचीही पाहणी केली. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिकला येणारे भाविक व पर्यटक यांना आवश्यक व पायाभूत सेवा-सुविधांबाबत अधिक दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, अॅड. राहुल ढिकले, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, एमएसआयडीसीचे अधिकारी ब्रिजेश दीक्षित, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व इतर अधिकारी उपस्थित होते.
Drought should be overcome through water conservation.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…