मद्यधुंद चालकाचा थरार

भरधाव कारची सहा वाहनांना धडक

सिडको : प्रतिनिधी
दीपालीनगर परिसरातील इनायत कॅफेसमोर मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवत पाच ते सहा वाहनांना धडक देऊन मोठे नुकसान केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याप्रकरणी प्रतीककुमार भरतभाई देसाई (वय 38, रा. गजानन पार्क, गोहर बाग, बिलीमोरा, जि. नवसारी, गुजरात) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार शंतनू प्रदीप कुलकर्णी (वय 49, रा. दुर्गाविहार, इंद्रप्रस्थ कॉलनी, उपनगर, नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जुलै रोजी रात्री सुमारे 10 वाजता फिर्यादी प्रतीककुमार देसाई हे त्यांचे मित्र शिवांग मिस्त्री आणि स्टिव्हन रिबेलो यांच्यासमवेत दीपालीनगर येथील इनायत कॅफेमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यांनी त्यांची जीजे 21 सीडी 0342 क्रमांकाची टाटा अल्ट्रोज कार हॉटेलबाहेर व्यवस्थित उभी केली होती. दरम्यान, एमएच 15 जेएस 9407 क्रमांकाची टोयोटा रुमिऑन कार चालविणारा शंतनू कुलकर्णी याने कथितपणे नशेच्या अमलाखाली भरधाव आणि बेदरकारपणे वाहन चालवत रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष केले.
त्यानंतर त्याने हॉटेलसमोर उभ्या असलेल्या पाच ते सहा वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात फिर्यादींच्या वाहनासह इतर वाहनांचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक निसार शेख पुढील तपास
करीत आहेत.

Drunken driver’s terrifying rampage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *