नाशिक

नाशिकमध्ये डंपर वाहतुकीचा कहर

आयटीआय सिग्नलला वाहनाचे नुकसान

♦ शहरात अवजड वाहनांसाठी निश्चित वेळ लागू करावी
♦ ओव्हरलोड डंपरवर कठोर कारवाई करावी
♦ सर्व डंपरना ताडपत्री बंधनकारक करावी
♦ वेगमर्यादेचे काटेकोर पालन करावे
♦ वाहतूक पोलिसांची गस्त वाढवावी
♦ अपघातप्रवण भागांत सीसीटिव्हीं आणि स्पीड
♦ मॉनिटर बसवावेत

नाशिक : प्रतिनिधी
स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणार्‍या नाशिक शहरात सध्या अवजड डंपर वाहतुकीमुळे नागरिकांचे जीवन अक्षरशः त्रस्त झाले आहे. काल एका कारला डंपर घासल्याने कारचालकाचे मोठे नुकसान झाले. आयटीआय सिग्नलजवळ ही घटना घडली. त्यामुळे वाहतुकीची कोंडीही झाली होती.
शहरातील विविध बांधकाम प्रकल्प, रस्त्यांची कामे, मुरूम-वाळू वाहतूक आणि औद्योगिक भागातील मालवाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर डंपरचा वापर होत असून, त्याचा थेट परिणाम शहरातील वाहतुकीवर आणि नागरिकांच्या सुरक्षेवर होत आहे.
विशेषतः सकाळी कार्यालयीन वेळेत आणि संध्याकाळी कामावरून परतताना गंगापूर रोड, मुंबई-आग्रा महामार्ग, द्वारका सर्कल, अंबड लिंक रोड, सिडको, पाथर्डी फाटा, पंचवटी आणि नाशिकरोड परिसरात डंपरची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी डंपर चालक भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याने दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नियम धाब्यावर; अपघातांचा धोका वाढला
वाहनधारकांच्या मते, अनेक डंपर चालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे खुलेआम उल्लंघन केले जात आहे. ओव्हरलोड वाहतूक, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, सिग्नल तोडणे, रात्री रिफ्लेक्टर किंवा मागील दिवे न वापरणे, तसेच भरधाव वेगामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत आहे. काही भागांत अरुंद रस्त्यांवरून मोठे डंपर जात असल्याने वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे.

नागरिकांचा संताप
रस्त्यावरून चालताना डंपर कधी धडक देईल याची भीती वाटते. वाहतूक पोलिस आणि प्रशासन फक्त कारवाईचे आश्वासन देतात; पण परिस्थितीत सुधारणा होत नाही, अशी प्रतिक्रिया एका वाहनधारकाने व्यक्त केली. तर काही नागरिकांनी शहरात अवजड वाहनांसाठी स्वतंत्र वेळ निश्चित करण्याची मागणी केली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर दिवसाच्या गर्दीच्या वेळेत डंपर बंद करावेत, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

प्रशासनाकडून कारवाईचे संकेत
दरम्यान, वाहतूक विभाग आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (ठढज) काही भागांत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या डंपर चालकांवर दंडात्मक कारवाई, फिटनेस तपासणी आणि परवाने तपासण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. तथापि, नागरिकांच्या मते ही कारवाई अपुरी असून, डंपर वाहतुकीवर कायमस्वरूपी नियंत्रणासाठी कठोर नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. नाशिककरांचा वाढता संताप पाहता प्रशासन आता ठोस पावले उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धूळ, माती आणि प्रदूषणाचा विळखा
डंपरमधून वाहून नेण्यात येणारी वाळू, मुरूम आणि खडी रस्त्यावर सांडत असल्याने शहरातील अनेक रस्ते धुळीने व्यापले गेले आहेत. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ आणि प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. दुचाकीस्वारांना रस्त्यावर साचलेल्या मातीमुळे घसरून अपघात होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. काही डंपरवर ताडपत्री न झाकल्यामुळे साहित्य थेट रस्त्यावर उडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

Dumper traffic wreaks havoc in Nashik

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

3 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

4 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

4 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

4 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

4 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

4 days ago