द्वारका चौकात भीषण अपघात; महिलेचा मृत्यू

नाशिक – (विशेष प्रतिनिधी)
द्वारका चौकात १६ चाकी सिमेंट मिक्सरच्या मागील चाकाखाली आल्याने अँक्टीवा मोपेडवरील धडक दिल्याने सुनंदा चोरडिया (वय ५२, रा. अशोका मार्ग) यांचा मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शी तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे ६.३० द्वारका चौकातील पूर्वी असलेल्या हनुमान मंदिरासमोर हा अपघात झाला. शिरपूर येथे जायचे असल्याने सुनंदा चोरडिया या पती राजेंद्र यांच्या समवेत अँक्टीवा (एमएच १५ ईके ४४११) मोपेडने जात होत्या. द्वारका चौकातून जात असताना सुनंदा चोरडिया यांचा तोल गेल्याने त्या दुचाकीवरून पडल्या. शेजारून जात असलेल्या १६ चाकी सिमेंट मिक्सर (एमएच १५ एचझेड ४६४६) च्या चाकाखाली आल्या. डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र पती राजेंद्र चोरडिया यांना काहीही दुखापत झाली नाही. डोळ्यासमोर पत्नीचा मृत्यू झाल्याने त्यांना जबर धक्का बसला होता. अपघाताचे वृत्त समजताच मुंबई नाका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हसन सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर घाबरून पळून जाणाऱ्या चालकास वाहनासह राणेनगर परिसरात ताब्यात घेण्यात आले आहे. वाहन चालकाचे नाल शिवशंकर यादव असल्याचे समजते.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

13 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago