महाराष्ट्र

सहा महिन्यांत खाद्यतेलाच्या दरात तब्बल 10 ते 12 टक्क्यांची वाढ

मौजे सुकेणे : प्रतिनिधी
गेल्या सहा महिन्यांत खाद्यतेलाच्या दरात सुमारे 10 ते 12 टक्क्यांनी वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह गृहिणींच्या स्वयंपाकघराचे अर्थकारण कोलमडले आहे.

खाद्यतेल दरवाढ तक्ता (प्रति लिटर)
खाद्यतेल          सहा महिन्यांपूर्वी         आजचा दर         वाढ
सोयाबीन तेल              150                       165             15
सूर्यफूल तेल                160                       176             16
शेंगदाणा तेल              190                       209            19
मोहरी तेल                   170                       187             17

सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून, दरमहा सरासरी 2 टक्क्यांनी दर वाढल्यामुळे घरगुती खर्चाचा ताळमेळ घालणे कठीण बनले आहे. या महागाईचा थेट फटका आहारावर पडत आहे, नागरिकांना तेलाचा वापर कमी करावा लागत आहे. व्यापार्‍यांच्या मते, कच्च्या तेलाच्या आयात खर्चात झालेली वाढ, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार आणि वाहतूक खर्च यांमुळे खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले आहेत. आगामी सणासुदीच्या काळात मागणी वाढणार असल्याने दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाढत्या महागाईवर गृहिणींकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, सरकारने त्वरित हस्तक्षेप करून खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात आणाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महिन्यांपूर्वी आहारात खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचा सल्ला दिला होता; मात्र सरकारने तेलाचे भाव एवढे वाढवले आहेत की, नागरिकांना नाइलाजाने आहारातील तेलाचे प्रमाण कमी करावे लागले आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
– अर्चना बोरस्ते, गृहिणी, कसबे सुकेणे

Edible oil prices have risen by a staggering 10 to 12 percent in six months.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 days ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 days ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 days ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 days ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 days ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 days ago