नाशिक

सप्टेंबरपासून बाजारात येणार कांद्याचा बफर स्टॉक

केंद्रीय पथकाकडून पाहणी; कांद्याचे दर घसरण्याची शक्यता

लासलगाव : वार्ताहर
सणासुदीच्या काळात कांद्याच्या किरकोळ किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार सप्टेंबरपासून बफर स्टॉकमधील कांदा टप्प्याटप्प्याने खुल्या बाजारात विक्रीसाठी आणण्याच्या तयारीत आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या उच्चस्तरीय पथकाने नुकताच नाशिक दौरा करून कांदा खरेदी, साठवणूक व बाजारस्थितीचा आढावा घेतल्यानंतर या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये भाव घसरण्याची चिंता वाढली आहे.

केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफमार्फत दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवले असले, तरी आतापर्यंत सुमारे 50 हजार मेट्रिक टन कांद्याचीच खरेदी झाली आहे. त्यामुळे उपलब्ध साठा मोठ्या शहरांतील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कितपत पुरेसा ठरेल, याबाबत साशंकता व्यक्त
होत आहे.
यंदा उत्पादन खर्चात वाढ, हवामानातील अनिश्चितता आणि बाजारातील चढ-उतारामुळे शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. अनेक उत्पादकांनी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये चांगल्या भावाच्या अपेक्षेने कांदा साठवून ठेवला आहे. मात्र, त्याच काळात सरकारी कांदा बाजारात आल्यास खुल्या बाजारातील दरांवर दबाव येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, केंद्र सरकारने बफर स्टॉकसाठी कांदा खरेदीचा दर 2,125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. सणासुदीत दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसारख्या प्रमुख शहरांमध्ये या साठ्यातील कांद्याचा पुरवठा करून महागाई नियंत्रणात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, शेतकरी संघटनांनी बाजारभाव वाढताच सरकारी हस्तक्षेप करण्याऐवजी शेतकर्‍यांच्या उत्पन्नाचे संरक्षण करणारे धोरण राबविण्याची मागणी केली आहे.

Onion buffer stock to hit the market from September

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 days ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 days ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 days ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 days ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 days ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 days ago