नाशिक

शिक्षण विभागाचा शाळा भेटीवर धडाका

आठवड्याला पाच शाळांना भेटी देणार

लासलगाव : वार्ताहर
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व निरंतर अध्ययनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनातर्फे विविध उपक्रम, प्रकल्प आणि योजनांची अंमलबजावणी शाळास्तरावर केली जाते. या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रभावीपणे होते का, त्यामध्ये कोणत्या अडचणी किंवा त्रुटी आहेत का, याचा आढावा घेऊन आवश्यक मार्गदर्शन, मदत आणि सुधारणा करण्याच्या उद्देशाने राज्यभर सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी नियमित शैक्षणिक शाळा भेटी द्याव्यात, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी
दिले आहेत.
याअंतर्गत राज्यस्तरीय अधिकारी दर पंधरा दिवसांत किमान दोन शाळांना भेट देतील. विभागीय व जिल्हास्तरीय अधिकारी दर आठवड्याला किमान दोन शाळा, तालुकास्तरीय अधिकारी दर आठवड्याला किमान तीन शाळा, अधीक्षक (शा.पो.आ.) आणि विस्तार अधिकारी (शिक्षण) दर आठवड्याला किमान चार शाळा, तर समूह साधन केंद्र समन्वयक दर आठवड्याला किमान पाच शाळांना भेटी देतील, असेही निर्देशित करण्यात आले आहे.
या भेटी वार्षिक तपासणी, चौकशी, स्नेहसंमेलन, स्पर्धा किंवा परीक्षा कालावधीतील भेटींपेक्षा वेगळ्या असून, त्यांचा मुख्य भर शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीवर असणार आहे, असे सूचित करण्यात आले आहे. शाळा भेटीदरम्यान अधिकार्‍यांच्या वतीने शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती, शाळा व विद्यार्थ्यांची स्वच्छता, वर्ग अध्यापनाचे निरीक्षण, विद्यार्थ्यांशी संवादाद्वारे शैक्षणिक संपादनाची पडताळणी, निपुण महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी, आनंददायी शनिवार, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी, डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम, पीएम पोषण योजनेची अंमलबजावणी, शैक्षणिक साहित्य, प्रयोगशाळा व क्रीडा सुविधांचा वापर तसेच विद्यार्थी सुरक्षेच्या उपाययोजनांची तपासणी करण्यात येणार आहे.

तात्काळ उपाययोजना करणे शक्य

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे हे राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. शासनाच्या विविध शैक्षणिक योजना, उपक्रम आणि प्रकल्पांचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचला पाहिजे. यासाठी शाळास्तरावर प्रत्यक्ष भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक आहे. अधिकार्‍यांच्या नियमित शाळा भेटींमुळे शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यमापन, अडचणींची ओळख, आवश्यक मार्गदर्शन आणि तात्काळ उपाययोजना करणे शक्य होईल. तसेच शाळांमध्ये सुरू असलेल्या चांगल्या व नावीन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन मिळेल. या भेटी केवळ तपासणीसाठी नसून, शाळांना आवश्यक मदत, मार्गदर्शन आणि सहकार्य मिळावे, हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.

Education Department slams school visit

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago