नाशिक

नाशिकरोडला विवाहितेचा विनयभंग

विरोध करणार्‍या पतीलाही मारहाण; गुन्हा दाखल

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड येथील गोरेवाडी परिसरात एका 23 वर्षीय तरुणाने विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. रिक्षातून उतरत असताना संशयिताने महिलेचा हात पकडून मोबाइल नंबरची मागणी केली. तसेच विरोध करणार्‍या महिलेच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला 29 जून रोजी सकाळी सव्वादहाच्या सुमारास पतीसह मुलाला शाळेत सोडून रिक्षाने घरी परतत होत्या. गोरेवाडी परिसरातील नवीन पाण्याच्या टाकीजवळ रिक्षाचा वेग कमी झाला असता, त्याच परिसरात राहणारा परिचयातील संशयित जयेश केशव थोरात (वय 23, रा. गोरेवाडी, शास्त्रीनगर) हा रिक्षाजवळ आला. त्याने महिलेचा उजवा हात पकडून मोबाइल नंबरची मागणी केली. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित गेल्या अनेक दिवसांपासून तिचा पाठलाग करत होता. तिच्या इच्छेविरुद्ध पाळत ठेवणे तसेच वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराला महिला व तिच्या पतीने विरोध केल्यानंतर संशयिताने आक्रमक भूमिका घेत महिलेच्या पतीला शिवीगाळ केली. त्यानंतर हाताने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर पीडित महिलेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार झाडे-जाधव करत आहेत.

Married woman molested at Nashik Road

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago