नाशिक

अरुंद मोरीत आयशर ट्रक पलटी

सिडको : प्रतिनिधी
सातपूर-अंबड लिंकरोडवरील दत्तमंदिर चौफुली परिसरात पशुपतिनाथ मंदिराजवळ शुक्रवारी (दि. 27) सायंकाळी सहाच्या सुमारास आयशर ट्रक शिवरोडवरील नाल्यात कोसळून उलटला. या अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला असून, सुदैवाने जीवितहानी टळली. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, आयशर ट्रक (एमएच 15 डीके 3480) सातपूर-अंबड लिंकरोडवरून दत्तमंदिर चौकातून पशुपतिनाथ मंदिराजवळून केवल पार्कच्या दिशेने जात होता. वळण घेताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट शिवरोडच्या नाल्यात कोसळून उलटला. अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक 26 चे नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. इंगोले आणि त्यांचे सहकारी अमोल हिवाळे यांनी नाल्यात अडकलेल्या जखमी चालकाला बाहेर काढून तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने सातपूर-अंबड लिंकरोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

सातपूर-अंबड लिंकरोडवरील दत्तमंदिर चौफुलीकडून सिडकोकडे जाणार्‍या शिवरोडवर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, पशुपतिनाथ मंदिराजवळील नाल्याची मोरी अरुंद असल्याने येथे अपघाताचा धोका कायम आहे. भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी या मोरीवर पूल बांधण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. त्यासाठी पाठपुरावा करू.
– निवृत्ती इंगोले, नगरसेवक

Eicher truck overturns in a narrow drain

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिन्नरच्या अतिक्रमणाविरोधात नगरपालिका आक्रमक!

सिन्नर : प्रतिनिधी दुकानांसमोरील जागेपासून थेट रस्ते आणि पदपथांपर्यंत पसरलेल्या अतिक्रमणांमुळे सिन्नर शहरातील वाहतुकीचा श्वास…

4 minutes ago

शालेय विद्यार्थ्यांची रुग्णवाहिकेतून ने-आण

देवळाली कॅन्टोन्मेंटचा अजब कारभार देवळाली कॅम्प : प्रतिनिधी देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…

13 minutes ago

शिवार रस्त्याच्या कामांतील त्रुटीमुळे ट्रॅक्टर उलटला

शेतकरी, वाहनचालक अडचणीत; ऊसतोडणीतही खोळंबा निफाड : तालुका प्रतिनिधी भरवस फाटा ते चास- कोळपेवाडी-दर्डे फाटा…

28 minutes ago

यात्रा-जत्रांच्या शहराला हवेत मोबाइल टॉयलेट

त्र्यंबकेश्वर नगर परिषदेची पालकमंत्र्यांकडे निधीची मागणी त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर नगर परिषदेसाठी 25 नग फिरती शौचालये…

54 minutes ago

लोणवाडे शिवारातील गोडावूनला भीषण आग

मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव-चाळीसगाव फाटा परिसरातील लोणवाडे शिवारात असलेल्या प्लास्टिक गोडावूनला गुरुवारी (दि. 26) रात्री…

1 hour ago

गंगापूर धरण समूहातून शेतीसाठी चार आवर्तने

पालकमंत्री : शहरात तूर्तास पाणीकपात टळली नाशिक : प्रतिनिधीं संभाव्य दुष्काळाचे संकट लक्षात घेता ऑगस्टअखेरपर्यंत…

2 hours ago