त्र्यंबकेश्वर नगर परिषदेची पालकमंत्र्यांकडे निधीची मागणी
त्र्यंबकेश्वर :
त्र्यंबकेश्वर नगर परिषदेसाठी 25 नग फिरती शौचालये (मोबाइल टॉयलेट) कायमस्वरूपी खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नाशिक येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्र्यांची भेट घेऊन हे निवेदन देण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्षा पल्लवी शिरसाठ, नगरसेविका कल्पना लहांगे यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते. या भेटीत शहरातील प्रलंबित विकासकामांबाबतही चर्चा करण्यात आली. त्र्यंबकेश्वर येथे वर्षभर भाविकांची मोठी वर्दळ असते. विशेषतः श्रावणमास, संत निवृत्तिनाथ महाराज यात्रा, उटीची वारी, पितृपक्ष आणि महाशिवरात्री काळात मोठी गर्दी होते. या काळात कायमस्वरूपी शौचालयांवर ताण येत असल्याने नगर परिषदेला तात्पुरती शौचालये भाडेतत्त्वावर घ्यावी लागतात. यावर दरवर्षी मोठा खर्च होऊन नगर परिषदेवर आर्थिक भार पडतो. नगरपरिषदेच्या मालकीची 25 मोबाइल टॉयलेट उपलब्ध झाल्यास हा खर्च वाचेल आणि स्वच्छतेची दीर्घकालीन सोय होईल, असे निवेदनात नमूद केले आहे.
त्र्यंबकेश्वर हे यात्रा-जत्रांचे शहर आहे. येथे येणार्या भाविकांसाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यास आमचे प्राधान्य असून, त्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
– त्रिवेणी तुंगार,
नगराध्यक्षा, त्र्यंबकेश्वर
The city of fairs and festivals needs mobile toilets
मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव-चाळीसगाव फाटा परिसरातील लोणवाडे शिवारात असलेल्या प्लास्टिक गोडावूनला गुरुवारी (दि. 26) रात्री…
पालकमंत्री : शहरात तूर्तास पाणीकपात टळली नाशिक : प्रतिनिधीं संभाव्य दुष्काळाचे संकट लक्षात घेता ऑगस्टअखेरपर्यंत…
विशिष्ट मक्तेदाराला लाभ देण्यासाठीचे प्रयत्न? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलाने 34 प्रकारची अत्याधुनिक…
विकासकामांना जुन्या देयकांचा विळखा; लोकप्रतिनिधी आक्रमक नाशिक : प्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीत (डीपीसी) नाशिक जिल्ह्यासाठी…
गिरीश महाजनांनी संभ्रमाचा पडदा दूर केला नाशिक : प्रतिनिधी स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत पक्षाचा प्रोटोकॉल मोडल्याने…
लोकसभेच्या जागा 543 वरून 816 होणार ♦ डीलीमिटेशन, महिला आरक्षणाशी जोडलेल्या बहुचर्चित घटनादुरुस्ती विधेयकाला नवा…