नाशिक

सिन्नरच्या अतिक्रमणाविरोधात नगरपालिका आक्रमक!

सिन्नर : प्रतिनिधी
दुकानांसमोरील जागेपासून थेट रस्ते आणि पदपथांपर्यंत पसरलेल्या अतिक्रमणांमुळे सिन्नर शहरातील वाहतुकीचा श्वास कोंडला जात आहे. पादचार्‍यांना चालणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक जागांवर अनधिकृतपणे व्यवसाय थाटणार्‍यांविरोधात आता नगरपरिषद प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी केली आहे. मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेने विक्रेते, फेरीवाले आणि दुकानदारांना अतिक्रमण स्वतःहून हटविण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली असून, त्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
सिन्नर शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते, फेरीवाले तसेच अन्य व्यावसायिकांकडून सार्वजनिक जागांचा वापर व्यवसायासाठी केला जात आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला प्लॅटफॉर्म, खाट, टेबल, बाक, स्टँड ठेवून व्यवसाय सुरू आहेत. काहींनी ताडपत्री, पाल आणि मंडप उभारून सार्वजनिक जागा व्यापल्या आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळे निर्माण होत असून, पादचार्‍यांनाही रस्त्यावरून चालण्याची वेळ
येत आहे.
केवळ रस्त्यावरील विक्रेतेच नव्हे, तर काही दुकानदारांनीही दुकानांसमोरील सार्वजनिक जागेवर ताबा मिळविल्याचे चित्र आहे. दुकानांसमोर ताडपत्री, शेड आणि अन्य साहित्य ठेवून अतिरिक्त जागा व्यापली जात आहे. काही ठिकाणी दुकानाच्या हद्दीबाहेर साहित्य मांडून व्यवसाय केला जात असल्याने सार्वजनिक जागेचा वापर मर्यादित झाला आहे. याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होत असून, नागरिकांची गैरसोय वाढत आहे.

तीन दिवसांत अतिक्रमण हटविण्याचे निर्देश
शहरातील सर्व भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते, फेरीवाले, हातगाडीधारक तसेच दुकानदार आणि व्यावसायिकांना सार्वजनिक रस्ते, चौक, पदपथ व दुकानांसमोरील जागेतील अनधिकृत साहित्य
स्वतःहून हटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्लॅटफॉर्म, खाट, टेबल, बाक, स्टँड, ताडपत्री, पाल, मंडप, शेड तसेच अन्य साहित्य ठेवून सार्वजनिक जागा अडवू नये, असे नोटिशीत स्पष्ट करण्यात
आले आहे.

रस्ते, पदपथ नागरिकांसाठी मोकळे ठेवा!

शहरातील सार्वजनिक रस्ते, चौक आणि पदपथ हे नागरिकांच्या वापरासाठी असून, त्यावर अनधिकृतपणे साहित्य ठेवून व्यवसाय करू नये. वाहतुकीला अडथळा होणार नाही आणि पादचार्‍यांची गैरसोय होणार नाही, याची प्रत्येक व्यावसायिकाने काळजी घ्यावी. संबंधितांनी स्वतःहून अतिक्रमण हटवून शहरातील सार्वजनिक जागा मोकळ्या ठेवाव्यात आणि नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्यासह नगरपरिषद प्रशासनाने
केले आहे.

पूर्वसूचनेशिवाय होणार कारवाई

नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून तीन दिवसांच्या आत संबंधितांनी अतिक्रमण हटविणे अपेक्षित आहे. निर्धारित मुदतीत अतिक्रमण कायम ठेवल्यास नगरपरिषद प्रशासनाकडून कोणतीही पुढील सूचना न देता अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. तसेच अनधिकृतपणे ठेवलेले साहित्य जप्त करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिकनगरी अधिनियम 1965 तसेच पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्रय विनियमन) अधिनियम 2014 आणि लागू नियमांनुसार ही कारवाई करण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.

Municipal Council takes an aggressive stance against encroachments in Sinnar!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

शालेय विद्यार्थ्यांची रुग्णवाहिकेतून ने-आण

देवळाली कॅन्टोन्मेंटचा अजब कारभार देवळाली कॅम्प : प्रतिनिधी देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…

19 minutes ago

अरुंद मोरीत आयशर ट्रक पलटी

सिडको : प्रतिनिधी सातपूर-अंबड लिंकरोडवरील दत्तमंदिर चौफुली परिसरात पशुपतिनाथ मंदिराजवळ शुक्रवारी (दि. 27) सायंकाळी सहाच्या…

25 minutes ago

शिवार रस्त्याच्या कामांतील त्रुटीमुळे ट्रॅक्टर उलटला

शेतकरी, वाहनचालक अडचणीत; ऊसतोडणीतही खोळंबा निफाड : तालुका प्रतिनिधी भरवस फाटा ते चास- कोळपेवाडी-दर्डे फाटा…

34 minutes ago

यात्रा-जत्रांच्या शहराला हवेत मोबाइल टॉयलेट

त्र्यंबकेश्वर नगर परिषदेची पालकमंत्र्यांकडे निधीची मागणी त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर नगर परिषदेसाठी 25 नग फिरती शौचालये…

1 hour ago

लोणवाडे शिवारातील गोडावूनला भीषण आग

मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव-चाळीसगाव फाटा परिसरातील लोणवाडे शिवारात असलेल्या प्लास्टिक गोडावूनला गुरुवारी (दि. 26) रात्री…

1 hour ago

गंगापूर धरण समूहातून शेतीसाठी चार आवर्तने

पालकमंत्री : शहरात तूर्तास पाणीकपात टळली नाशिक : प्रतिनिधीं संभाव्य दुष्काळाचे संकट लक्षात घेता ऑगस्टअखेरपर्यंत…

2 hours ago