नाशिक

मानवता, प्रेमाचा संदेश देत ईद उत्साहात

देशाची प्रगती, पाऊस आणि बंधुभावासाठी खास दुआ

जुने नाशिक : वार्ताहर
त्याग, बलिदान, मानवता आणि परस्पर प्रेमाचा संदेश देणारा पवित्र ईद-उल-अज्हा अर्थात बकरी ईदचा सण काल (दि.28) शहर परिसरासह जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील त्र्यंबक रोडवरील ऐतिहासिक शहाजहाँनी ईदगाह मैदानावर खतीब-ए-शहर हाफीज हिसामुद्दिन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली हजारो मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज अदा केली. यावेळी भारताच्या प्रगती व पावसासाठी तसेच बंधुभाव टिकून राहण्यासाठी खास दुआ करण्यात आली.
पहाटे फजर नमामानंतर ईदच्या तयारीला वेग आला होता. ईदगाह येथील नमाजाच्या सोहळ्यापूर्वी शहरातील अनेक मशिदींतून मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. मनोहर मार्केट येथील गुलशन तैयबा मशिदीत सकाळी साडेसात वाजता मौलाना शहानवाज रजा यांच्या नेतृत्वाखाली नमाज अदा करण्यात आली. वडाळारोडवरील आयेशा मशीद येथे मौलाना हाफिज जाहीद यांनी नमाजचे नेतृत्व केले. चौकमंडईतील ऐतिहासिक जहांगीर मशिदीत मौलाना शरीफ सय्यद यांच्या नेतृत्वाखाली नमाज अदा करण्यात आली. दरम्यान, सकाळी दहा वाजेच्या सुमारास ईदगाह येथील मुख्य नमाज पठणास प्रारंभ झाला. तत्पूर्वी मौलाना मेहबूब आलमा यांनी ईदचे महत्त्व विशद केले. नमाजानंतर देशाच्या कल्याणासाठी विशेष दुआ करण्यात आली. तसेच देशात शांतता आणि सौहार्द कायम राहावे, भारताची प्रगती व्हावी, सर्व समाजात बंधुभाव आणि एकात्मता कायम राहावी, राज्यात भरपूर पाऊस पडून दुष्काळी परिस्थिती दूर व्हावी, बेरोजगारी आणि महागाई कमी व्हावी तसेच सर्व प्रकारच्या संकटांपासून देशाला संरक्षण मिळावे, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. पवित्र सलातोसलामचे सामूहिक पठणानंतर नमाजाच्या विधीची सांगता झाली. तत्पूर्वी ईदगाह कमिटीतर्फे पोलीस व मनपा प्रशासनाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. याचे सूत्रसंचालन फारूक पठाण यांनी केले. दरम्यान, नमाजासाठी उपस्थित भाविकांनी डोक्यावर साफा, फेटे आणि पारंपरिक टोप्या परिधान केल्या होत्या. पठाणी सूट, कुर्ता-पायजमा तसेच विविध इस्लामी पोशाखांमध्ये युवक आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. लहान मुलांनी आकर्षक रंगीबेरंगी कपडे आणि टोप्या घालून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
ईदगाह मैदानात पोलीस आयुक्तालय व मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्यातर्फे स्वागत मंडप उभारण्यात आले होते. या मंडपात मुस्लिमबांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्रशासनातील अधिकारी तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. ईदचा सण शांततेत आणि सुरळीत पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महापालिकेकडून ईदगाह मैदान व परिसरातील स्वच्छता करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. याशिवाय, दावते इस्लामीच्या जीएनआरएफ युनिटकडून ईदगाह मैदानात थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात आली होती. नमाजानंतर मुस्लिमबांधवांनी एकमेकांना ‘ईद मुबारक’ म्हणत शुभेच्छा दिल्या. ईदगाहवरून परतताना अनेकांनी गोरगरिबांना दानधर्म केला. नमाजानंतर हजारो भाविकांनी बडी दर्गाह शरीफचे दर्शन घेतले. तसेच शहरातील विविध कब्रस्तानांत जाऊन मृत आप्तेष्टांच्या कबरीवर फातेहा पठण करून विशेष दुआ करण्यात आली. दिवसभर बोकडांची कुर्बानी देण्याचा विधी सुरू होता. यानंतर एकमेकांच्या घरी जाऊन कुर्बानीचा प्रसाद वाटप करण्याचा सिलसिलादेखील रात्री उशिरापर्यंत
सुरू होता.

सोशल मीडियावर ‘ईद मुबारक’
मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व धर्मीय मित्रमंडळींनी सोशल मीडियाचा भरपूर वापर केला. मुस्लिम समाजबांधवांनीदेखील एकमेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ईद मुबारकचे संदेश पाठविले. दरम्यान, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून ईदच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. याशिवाय, कोणत्या मशिदीत किती वाजता नमाज होणार आहे, याची माहितीदेखील सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली होती.

 

 

 

 

 

Eid in full swing, giving a message of humanity and love

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

3 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

3 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

3 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

3 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

4 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

4 hours ago