मृतदेहासह नागरिकांचा रास्ता रोको
मालेगाव : प्रतिनिधी
कुसुंबा रोडवरील नवीन बसस्थानकाजवळ शनिवारी (3 ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारास भरधाव कंटेनरच्या धडकेत 71 वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. राबिया शब्बीर अहमद (रा. लालानगर, मालेगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रविवारी (4 ऑक्टोबर) सकाळी बसस्थानकासमोरील पुलाखाली मृतदेहासह आंदोलन करत या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची मागणी केली.
हॉटेल मदिना दरबार परिसरात शनिवारी पहाटे राबिया अहमद रस्ता ओलांडत असताना भरधाव कंटेनरने ( केए 56-8995) त्यांना जोराची धडक दिली. कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी त्यांना तातडीने मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताचे भीषण दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले असून, पोलिसांनी तत्परता दाखवत कंटेनर व चालकाला ताब्यात घेतले आहे.
आंदोलनाची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ आणि तहसीलदार विशाल सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांची चर्चा केली. दिवसा अवजड वाहनांची वाहतूक बंदीचा निर्णय आधीच झाला असून, रात्रीचीही वाहतूक बंद करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ प्रशासनाकडे तातडीने पाठवला जाईल, असे आश्वासन अपर पोलीस अधीक्षक गुंजाळ यांनी दिले. प्रशासनाकडून कठोर कारवाईचे आणि योग्य ती अंमलबजावणी करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात शफीक भाई, निहाल हाजी, जिया मुस्कान, खालिद एस. के., फारुक कालिया, सत्तार अॅम्ब्युलन्सवाला यांच्यासह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.
गेल्या दीड महिन्यात या मार्गावर झालेल्या अपघातांत चार जणांचा मृत्यू झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. यापूर्वी प्रशासनाला दिलेल्या निवेदनांवर केवळ आश्वासने मिळाली, पण प्रत्यक्षात बंदीची अंमलबजावणी झाली नाही, असा आरोप
नागरिकांनी केला.
Elderly woman dies after being hit by a container truck.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…