अतिक्रमण विभाग ऍक्शन मोडवर

नाशिक : प्रतिनिधी
शहराचे विद्रुपीकरण करणारे अनाधिकृत होर्डिग व बॅनगर हटाव मोहीम महापालिकेने घेतली आहे. त्यानुसार पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या हद्दीतील 19 तर 22 जाहीरात फलक काढण्यात आले.
नाशिकरोड, पूर्व, पश्‍चिम, पंचवटी, सातपूर व नवीन नाशिक या सहाही विभागात ही मोहीम राबवली जात आहे. त्यानुसारपालिका हद्दीतील 10 मोठे फलक, 19 बॅनर, 14 पोस्टर स्टॅन्ड बोर्ड, झेंडे , 95 पताका हटविण्यात आले आहे. नाशिक पश्चिम विभागात एकूण 44 जाहिरात फलक काढण्यात आली. तर सातपूर मध्ये बोर्ड तर नाशिक रोड विभागात सर्वात जास्त कामगिरी केली करण्यात आली आहे. नाशिकरोड विभागात 10 मोठे होर्डिंग, 19 पोस्टर बॅनर, 14 पोस्टर बॅनर, 10 स्टँड बोर्ड जाहिरात फलक, 95 हटविण्यात आले आहे. यापुढेही अतिक्रमण विभागाची कारवाई सुरूच राहणार असून अनधिकृतपणे बॅनर पोस्ट जाहिरात फलक लावणार्‍याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरातील अनधिकृत फलक, जाहीराती पोस्टर यावर मनपा आयुक्तांची नजर आहे.
महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी शहर सौंदर्यीकरणाच्या करण्याच्या दृष्टीने विशेष लक्ष दिले असून शहराला विद्रुपीकरण करणार्‍यांना अनाधिकृत होर्डींग,जाहिरात फलक तत्काळ काढण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले आहे विभागीय अधिकार्‍यांनी आपापल्या विभागात ही कारवाई करायची आहे. त्या दृष्टीने शहर विद्रुपीकरण करणार्‍या बोर्डिंग बॅनर पोस्टर फलक हटविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *