एन्डोस्कोपिक अल्ट्रासाउंंड

पचनसंस्थेचे अधिक अचूक निदान

एन्डोस्कोपिक अल्ट्रासाउंड (ईयूएस) हे एन्डोस्कोपी आणि अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाचे संयोजन असलेले आधुनिक निदान तंत्र आहे. यामुळे अन्ननलिका, पोट व लहान आतड्याच्या आतील भागासह पॅन्क्रियास, गॉलब्लॅडर, बाइल डक्ट, लिव्हर, लिम्फ नोड्स तसेच पचनसंस्थेभोवतीच्या गाठींचे बारकाईने परीक्षण करता येते.
सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय किंवा एमआरसीपीमध्ये संशयास्पद बदल आढळल्यास पुढील तपासणीसाठी ईयूएसचा उपयोग केला जातो. पॅन्क्रियासमधील गाठ किंवा सिस्ट, क्रॉनिक अथवा वारंवार होणारा पॅन्क्रियाटायटिस, बाइल डक्टमधील सूक्ष्म खडे किंवा अडथळे, गॉलब्लॅडरमधील लहान खडे, लिम्फ नोड्स आणि पचनसंस्थेच्या आसपासच्या गाठींच्या निदानासाठी ही तपासणी उपयुक्त ठरते.
ईयूएसमध्ये संबंधित अवयवाच्या अगदी जवळून अल्ट्रासाउंड केल्यामुळे बाहेरून होणार्‍या सोनोग्राफीपेक्षा काही सूक्ष्म बदल अधिक स्पष्ट दिसू शकतात. संशयास्पद गाठ आढळल्यास याच तंत्राच्या मार्गदर्शनाखाली फाइन नीडल स्पिरेशन (एफएनए) किंवा फाइन नीडल बायोप्सी (एफएनबी) करून पेशी अथवा टिश्यूचा नमुना घेता येतो. काही निवडक रुग्णांमध्ये फ्लुइड कलेक्शन किंवा स्यूडोसिस्टचे ड्रेनेज तसेच बाइल डक्ट किंवा गॉलब्लॅडरशी संबंधित काही उपचारात्मक प्रक्रियांसाठीही ईयूएसचा उपयोग होतो.
अनुभवी तज्ज्ञ आणि प्रशिक्षित वैद्यकीय टीमकडून केल्यास ही तपासणी सामान्यतः सुरक्षित आहे. गरजेनुसार सेडेशन किंवा नेस्थेशिया दिला जाऊ शकतो. मात्र, प्रत्येक पोटदुखी, अपचन किंवा पित्ताशयाच्या तक्रारीसाठी ईयूएस आवश्यक नसते. रुग्णाची लक्षणे, रक्ततपासण्या व उपलब्ध अहवालांचा अभ्यास करून गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट त्याची आवश्यकता ठरवतात.
डीॉएन्डोस्कोपिक अल्ट्रासाउंडने पचनसंस्थेचे अधिक अचूक निदान ः एन्डोस्कोपिक अल्ट्रासाउंड (ईयूएस) हे एन्डोस्कोपी आणि अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाचे संयोजन असलेले आधुनिक निदान तंत्र आहे. यामुळे अन्ननलिका, पोट व लहान आतड्याच्या आतील भागासह पॅन्क्रियास, गॉलब्लॅडर, बाइल डक्ट, लिव्हर, लिम्फ नोड्स तसेच पचनसंस्थेभोवतीच्या गाठींचे बारकाईने परीक्षण करता येते.
सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय किंवा एमआरसीपीमध्ये संशयास्पद बदल आढळल्यास पुढील तपासणीसाठी ईयूएसचा उपयोग केला जातो. पॅन्क्रियासमधील गाठ किंवा सिस्ट, क्रॉनिक अथवा वारंवार होणारा पॅन्क्रियाटायटिस, बाइल डक्टमधील सूक्ष्म खडे किंवा अडथळे, गॉलब्लॅडरमधील लहान खडे, लिम्फ नोड्स आणि पचनसंस्थेच्या आसपासच्या गाठींच्या निदानासाठी ही तपासणी उपयुक्त ठरते.
ईयूएसमध्ये संबंधित अवयवाच्या अगदी जवळून अल्ट्रासाउंड केल्यामुळे बाहेरून होणार्‍या सोनोग्राफीपेक्षा काही सूक्ष्म बदल अधिक स्पष्ट दिसू शकतात. संशयास्पद गाठ आढळल्यास याच तंत्राच्या मार्गदर्शनाखाली फाइन नीडल स्पिरेशन (एफएनए) किंवा फाइन नीडल बायोप्सी (एफएनबी) करून पेशी अथवा टिश्यूचा नमुना घेता येतो. काही निवडक रुग्णांमध्ये फ्लुइड कलेक्शन किंवा स्यूडोसिस्टचे ड्रेनेज तसेच बाइल डक्ट किंवा गॉलब्लॅडरशी संबंधित काही उपचारात्मक प्रक्रियांसाठीही ईयूएसचा उपयोग होतो.
अनुभवी तज्ज्ञ आणि प्रशिक्षित वैद्यकीय टीमकडून केल्यास ही तपासणी सामान्यतः सुरक्षित आहे. गरजेनुसार सेडेशन किंवा नेस्थेशिया दिला जाऊ शकतो. मात्र, प्रत्येक पोटदुखी, अपचन किंवा पित्ताशयाच्या तक्रारीसाठी ईयूएस आवश्यक नसते. रुग्णाची लक्षणे, रक्त तपासण्या व उपलब्ध अहवालांचा अभ्यास करून गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट त्याची आवश्यकता ठरवतात.

Endoscopic Ultrasound

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *