उत्तर महाराष्ट्र

सरावल्या हातांनाही सुटतो कंप!

पार्किसन्स डिसीज जनजागृतीची गरज

 

नाशिक ः प्रतिनिधीवयाच्या 17 व्या वर्षीही कंपवात झालेला रुग्ण पार्किसन्स हा आजार अनुंवांशीक कारणांचेे उदाहरण आहे. तर वयाच्या तिशीपासून ऐंशीपर्यत या आजाराचे रुग्ण आढळतात. सध्या पार्किसन्स्‌ सोसायटी नाशिक येथे 400 हून अधिक रुग्ण उपचार घेत आहे. रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांनाही प्रशिक्षित केले जात आहे.

रुग्णांना नित्याची कामे करता येणे सोपे जावे यासाठी फिजिओथेरपी अणि इतर व्यायाम या पार्किसन्स्‌ सोसायटी संस्थेत करण्यात येत आहे.एकदा हा आजार झाला की आयुष्यभर सोबतीला राहतो.यापासून सुटका करायची झाल्यास फिजिओथेरपी,व्यायामाशिवाय पर्याय नाही.

पार्किसन्ससारखा दुर्मीळ आजार मेंदुच्या पेशी कमकुवत होवून हातापायांची होणारी थरथर,नित्याची कामे करु न शकल्यामुळे इतरांवर विसंबून रहावे लागते.अशा व्यक्तींसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन,फिजिओथेरपी करण्यासाठी नाशिक पार्किसन्स्‌ सोसायटीच्या वर्णा क्वार्डोस यासंस्थेद्वारे अनेक वर्षापासून मोफत सेवा आणि समुपदेशन करीत आहेत.

पार्किसन्स्‌ एक मेंदूशी निगडीत हळूहळू वाढत जाणारा आजार आहे. पार्किन्सनमध्ये मेंदूतील डोपामाइन या रसायनाचे उत्पादन कमी होते. पार्किंसन्सचे निदान आणि थेट कारण अजूनही सापडलेले नाही. हे मोठ्या प्रमाणात ज्येष्ठांमध्ये (60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयस्कर) आढळते, परंतु 21 ते50  वर्षे वयोगटातील लोकांमध्येही हे मोठ्याप्रमाणात आढळत आहे ज्यास यंग ऑनसेट पार्किन्सन म्हटले जाते.

बर्‍याच लोकांना पार्किसन्स्‌ म्हणजे कंपन एवढेच माहित असते. परंतु या आजारात फक्त कंपनच नव्हे तर इतरही अनेक लक्षणे असतात. यात मुख्यत्वे कंपन, कडकपणा, हालचाल मंदावणे आणि तोल जाणे ही मोटर लक्षणे म्हणजेच हलचालींशी संबंधित लक्षणे आढळतात. पार्किन्सनच्या व्यक्तीसाठी, लिहिणे,चालणे, आंघोळ करणे, कपडे घालणे इत्यादी रोजची कामे पार पाडणे खूप अवघड होते.

सिटीलिंक बससेवा ठप्प

हा जरी हालचाली संबंधीत आजार (मूवमेंट डिसोर्डर) असला तरी हालचाली बरोबर पुढे मानसिक व बौद्धिक लक्षणे सुद्धा आढळू लागतात. त्यात बोलणे, अन्न गिळणे आणि झोप यांच्या समस्यांसहित नैराश्य, चिंता, भ्रम आणि  मनाचा कल यांत बदल होणे यासारखी मानसिक लक्षणे असतात. यामुळे बहुधा पार्किन्सनच्या व्यक्तीला आपली काळजी घेणार्‍यांवर अवलंबून रहावे लागते.

पार्किन्सनच्या पुनर्वसनासाठी मोलाची भूमिका बजावणार्‍या काळजी घेणार्‍या नातेवाइकांना बर्‍याचदा त्रास आणि तणावाचा सामना करावा लागतो.

या आजाराच्या रुग्णांना माहिती मदत व्हावी  यासाठी या संस्थेच्या सहकार्याने येथे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनाही प्रशिक्षीत  केले जाते. कोरोना काळात ऑनलाइन संपर्क करून रुग्णांची काळजी घेण्यात येते.
वर्ना क्वार्डोस
पार्किसन्स्‌ सोसायटी नाशिक

अशी झाली संस्थेची स्थापना
मुंबई येथील डॉक्टरांनी सुरू केलेल्या या संस्थेचे नाशिकसह पुणे,कोल्हापूर अशा 13 ते 14 शहरांमघ्ये पार्किसन्स्‌ केंद्रे आहेत. वर्ना क्वार्डोस या नाशिकमधील काम पहातात.
ग्रामीण भागातही संस्थेचय वतीने पार्किसन्स्‌ नाही तर अन्य रुग्णांनाही स्वावलंबी केले जात असून त्यांना व्यायाम आणि अन्य कामांचे प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली आहे.
डॉ. जेम्स  पार्किसन्स यांनी 200 वर्षा पूर्वी शेकिंग पाल्सी किंवा कंपवात या आजाराचा शोध लावला म्हणून याला पार्किसन्स असे नाव देण्यात आले आहे. 11 एप्रिल हा त्यांचा वाढदिवस जागतिक  पार्किसन्स दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. एप्रिल महिना हा  पार्किसन्स जनजागृती महिना म्हणून साजरा करतात. परंतु  पार्किसन्स आजाराबद्दल सामान्य लोकांना विशेष माहिती नाही. आणि म्हणूनच याबद्दल जनजागृती करणे गरजेचे आहे.
Devyani Sonar

Recent Posts

नाशिक खुनाच्या घटनेने हादरले, कुकरचे झाकण, कोयत्याने मारल्याने पत्नीचा मृत्यू

सिडको: विशेष प्रतिनिधी घरातील आपआपसांतील वाद पराकोटीला गेल्याने नवऱ्याने रागाच्या भरात मंगळवारी (दि.४) राहत्या घरात…

16 hours ago

सुला फेस्टचा समारोप

*हिप हॉप रॅपवर थिरकत फुल टु एन्जॉय करत इलेक्ट्रिफाईंग वातावरणात दोन दिवसीय सुला फेस्टचा समारोप*…

3 days ago

सापुतारा जवळ बस दरीत कोसळून पाच प्रवाशी ठार

सापुतारा जवळ बस दरीत कोसळून पाच प्रवाशी ठार ४५ प्रवासी जखमी. सुरगाणा : प्रतिनिधी वणी…

3 days ago

दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले

दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले महिला गंभीर जखमी; सातपूरची घटना सातपूर : प्रतिनिधी सातपूर नाशिक…

5 days ago

स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली

स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली सिडको : विशेष प्रतिनिधी चुंचाळे…

6 days ago

नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी

नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी मनमाड :आमिन…

6 days ago