नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
देशसेवा करून निवृत्त झालेल्या एका माजी सैनिकाला हक्काच्या घरासाठी प्लॉट देण्याचे आमिष दाखवून तब्बल 9 लाख 70 हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे महापालिकेतील गटनेते केशव पोरजे, त्यांचा शालक विशाल मालुंजकर आणि गणेश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिलकुमार शिवराम बारी (52, रा. जयभवानी रोड) हे भारतीय सेनेतून सेवानिवृत्त झाले आहेत. 2015 मध्ये ते आर्टिलरी सेंटर येथे कार्यरत असताना, त्यांची ओळख गणेश बबन जाधव याच्याशी झाली होती. जाधव याने वडनेर शिवारातील सर्व्हे क्र. 239/1 मधील 2 आरचा प्लॉट विक्री करायचा असल्याचे बारी यांना सांगितले. सेवानिवृत्तीनंतर नाशिकमध्येच स्थायिक व्हायचे असल्याने बारी यांनी 2 लाख 20 हजार रुपयांत हा व्यवहार निश्चित केला आणि वेळोवेळी रक्कम अदा केली. प्लॉटचा ताबा मागितला असता, जागा ग्रीन झोनमध्ये असल्याचे सांगून ती एनए (बिगरशेती) करून देण्याचे आमिष जाधवने दाखवले. यासाठी बारी यांच्याकडून टप्प्याटप्प्याने 7 लाख 50 हजार रुपये जादा उकळण्यात आले. मात्र, तीन वर्षे उलटूनही प्लॉट मिळाला नाही की एनए झाला नाही. जेव्हा बारी यांनी पैशांसाठी तगादा लावला, तेव्हा जाधवने दिलेले चेक बाऊन्स झाले.
या वादात स्थानिक नगरसेवक केशव पोरजे यांनी मध्यस्थी केली. या व्यवहारात माझा शालक विशाल मालुंजकर हा भागीदार आहे, असे सांगून त्यांनी बारी यांना धक्का दिला. पोरजे यांनी जाधव आणि मालुंजकर यांच्याकडे सध्या पैसे नसल्याचे सांगत, व्यवहार मिटवण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही हक्काचे पैसे आणि जमीन मिळत नसल्याने अखेर माजी सैनिक अनिलकुमार बारी यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांची कारवाई माजी सैनिकाच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी गणेश जाधव, विशाल मालुंजकर आणि केशव पोरजे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, राजकीय वर्तुळात या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबतच्या व्यवहाराचा विषय स्थानिक लोकप्रतिनिधी असल्याने माझ्याकडे आल्यानंतर मी त्याची मध्यस्थी केली. मध्यस्थी झाल्यानंतर व्यवहार पूर्ण झाला का नाही, याची मला माहिती नाही. या आर्थिक व्यवहाराशी माझा कोणताही संबंध अगर देणे-घेणे नाही.
– केशव पोरजे, नगरसेवक तथा गटनेते शिवसेना उबाठा
Ex-soldier cheated of Rs 9 lakh 70 thousand on the pretext of house
आयपीएल अर्थात, इंडियन प्रीमियर लीगचे हे एकोणिसावे वर्ष आहे. सलग एकोणीस वर्षे आपली लोकप्रियता टिकवून…
चार वर्षांपूर्वी म्हणजे 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. या युद्धाचा परिणाम जगावर…
पालकांना पसंतीच्या दुकानांतून खरेदीची मुभा; शिक्षण विभागाचे परिपत्रक सिन्नर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या गणवेश, वह्या-पुस्तके तसेच…
‘आयपीएल’च्या धर्तीवर खेळाडूंचा लिलाव; 16 संघांमध्ये रंगणार टेनिस बॉल डे-नाईट स्पर्धा सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर…
उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार कळवण : प्रतिनिधी प्रसूतीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मातेचा प्रसूतीनंतर काही…
नाशिक : प्रतिनिधी शहरात अलीकडे घडलेल्या विविध घटनांमधून महिलांचे लैंगिक शोषण तसेच धर्मांतरणासारख्या प्रकारांचा पर्दाफाश…