नाशिक

मखमलाबाद बसस्टॅण्ड परिसरातील अनधिकृत टपर्‍या जमीनदोस्त

पंचवटी : प्रतिनिधी
मखमलाबाद बसस्टॅण्ड परिसरातील स्मशानभूमी लगत अनधिकृत ठेवलेल्या चार ते पाच टपर्‍या मनपाच्या पंचवटी अतिक्रमण विभागाच्या वतीने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आल्या.
मनपा आयुक्त मनीषा खत्री, उपायुक्त अतिक्रमण सुवर्णा दखणे यांच्या आदेशान्वये मनपा पंचवटी विभागीय अधिकारी राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरात सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण मोहीम सुरू आहे. तर मखमलाबाद बसस्टॅण्ड परिसरात स्मशानभूमीलगत काही अनधिकृत टपर्‍या ठेवण्यात आल्या होत्या. या ठिकाणी अवैध मद्य विक्री सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या.
या ठिकाणी जवळच शाळा असल्याने विद्यार्थिनींची छेडछाड होत असल्याच्यादेखील तक्रारीही होत्या. त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी अतिक्रमण विभागाच्या वतीने गुरुवार (दि. 16) सकाळी जेसीबीच्या सहाय्याने पाच ते सहा टपर्‍या जमीनदोस्त करण्यात आल्या. मोहिमेत अतिक्रमण गाडी प्रमुख उमेश खैरे, प्रवीण मोरे, नीलेश काळे, मधू पवार, नंदू खांडरे, दत्ता आहेर, राजू सालुखे, एनडीआरएस टीमप्रमुख जे. के. जगताप यांच्यासह मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षक उपस्थित होते.

अवैध मद्यविक्री कधी बंद होणार?

बसस्टॅण्ड परिसरात टपर्‍या आणि त्या समोर असलेल्या सुलभ शौचालयाच्या जवळ, पाठीमागे उघड्यावर मद्यविक्री केली जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. तर जवळच एका संस्थेची शाळा असून, या शाळेत विद्यार्थी, विद्यार्थिनी ये-जा करत असल्याने उघड्यावर मद्य पीत असल्याने त्याचा त्रासदेखील होतो. तसेच गावात ज्या दिवशी दशक्रिया असतो, त्यावेळीही बाहेरगावाहून येणार्‍या नागरिकांना मद्यप्रेमींचे दर्शन होत असते. त्यामुळे या भागातील मद्यविक्री कधी बंद होणार, असा प्रश्नदेखील सुजाण नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Unauthorized stalls in Makhamalabad bus stand area demolished

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सोशल मीडियावरही ’आयपीएल’चा फीव्हर; हिताचे रक्षण व्हायला हवे!

आयपीएल अर्थात, इंडियन प्रीमियर लीगचे हे एकोणिसावे वर्ष आहे. सलग एकोणीस वर्षे आपली लोकप्रियता टिकवून…

8 hours ago

मान्सून अंदाज चिंताजनक

चार वर्षांपूर्वी म्हणजे 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. या युद्धाचा परिणाम जगावर…

8 hours ago

गणवेश-साहित्य खरेदीत शाळांच्या सक्तीला लगाम!

पालकांना पसंतीच्या दुकानांतून खरेदीची मुभा; शिक्षण विभागाचे परिपत्रक सिन्नर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या गणवेश, वह्या-पुस्तके तसेच…

8 hours ago

सिन्नरमध्ये आजपासून क्रिकेटचा महासंग्राम

‘आयपीएल’च्या धर्तीवर खेळाडूंचा लिलाव; 16 संघांमध्ये रंगणार टेनिस बॉल डे-नाईट स्पर्धा सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर…

8 hours ago

कळवणला प्रसूतीनंतर काही तासांत मातेचा मृत्यू

उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार कळवण : प्रतिनिधी प्रसूतीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मातेचा प्रसूतीनंतर काही…

9 hours ago

महिला अत्याचारांवर ‘झीरो टॉलरन्स’साठी आज बैठक

नाशिक : प्रतिनिधी शहरात अलीकडे घडलेल्या विविध घटनांमधून महिलांचे लैंगिक शोषण तसेच धर्मांतरणासारख्या प्रकारांचा पर्दाफाश…

9 hours ago