नाशिक

पानटपरी चालकाकडे मागितली 10 लाखांची खंडणी

एफडीएच्या तोतया अधिकार्‍यासह सहा जणांना अटक

नाशिकरोड : प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासन विभागाचे बनावट अधिकारी बनून एका पानटपरी चालकाला तब्बल दहा लाख रुपयांची खंडणी मागणार्‍या सहा जणांच्या टोळीला उपनगर पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी ठाणे, घाटकोपर व डोंबिवली परिसरातील रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेलरोड परिसरातील रहिवासी दीपक पोपटराव बोराडे (वय 55) यांची शिवाजीनगर बसस्टॉपजवळ शिवनेरी नावाची पानटपरी आहे. 22 जून रोजी सकाळी 11.30 वाजता बोराडे नेहमीप्रमाणे आपल्या टपरीवर व्यवसाय करत असताना, एमएच 46- सीयू 8706 क्रमांकाच्या इर्टिगा गाडीतून तीन पुरुष आणि तीन महिला अचानक तिथे उतरल्या.
टपरीचालकाची कोणतीही परवानगी न घेता त्यांनी आत प्रवेश केला. आम्ही फूड अँड ड्रग्स विभागाकडून आलो असून, तुम्ही गुटखा विक्री करत असल्याची माहिती मिळाली आहे, असे सांगत त्यांनी टपरीची झडती घेण्यास सुरुवात केली. बोराडे यांनी ओळखपत्राची मागणी केली असता, त्यांनी लांबूनच एक बनावट आयकार्ड दाखवून हुज्जत घातली. या टोळीतील एकाने आपण पत्रकार असल्याचे सांगत कॅमेरा काढून टपरीचे शूटिंग सुरू केले. सर्वांनी बोराडे यांना वेढा घातल्याने ते प्रचंड घाबरले. या परिस्थितीचा फायदा घेत कारवाई थांबवायची असेल तर दहा लाख रुपये द्यावे लागतील. बोराडे यांनी एवढी रक्कम देण्यास असमर्थता दर्शविल्यावर, फोनवर बोलण्याचे नाटक करत तडजोडीअंती पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. संशय आल्याने पानटपरीचालक बोराडे यांनी हुशारी दाखवत, त्यांचे ओळखीचे स्थानिक पत्रकार संदीप नवसे यांना फोन करून तातडीने बोलावून घेतले.
पत्रकार नवसे यांनी घटनास्थळी पोहोचून या संशयितांकडे कसून चौकशी सुरू केली आणि तत्काळ उपनगर पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुनील गजानन मालुसरे (रा. घाटकोपर, मुंबई), शरद रामचंद्र गायकर (रा. दिवा, ठाणे), शरद भगवान पाटील (रा. डोंबिवली), गौरी महेश बर्डे (रा. ठाणे), सरिता संजय मोरे (रा. पूर्व ठाणे) व सरला शरद गायकर (रा. दिवा, ठाणे) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी जेव्हा या सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांची ओळखपत्रे तपासली, तेव्हा त्यांचे पितळ उघडे पडले. आपण अधिकारी नसून सामाजिक कार्यकर्ते असल्याचे सांगत त्यांनी घूमजाव केले. दीपक बोराडे यांच्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात या सहाही तोतयांविरुद्ध खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या टोळीने आणखी कोणाला अशा प्रकारे लुटले आहे का, याचा तपास आता उपनगर पोलीस करत आहेत.

Extortion of ₹10 lakh demanded from paan stall owner.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago