नाशिक

मनमाडला माथेफिरूकडून दोघांची दगडाने ठेचून हत्या

पोलिसांचा पाठलाग, संशयित जेरबंद

नांदगाव : प्रतिनिधी
मनमाड शहरात एका माथेफिरूने दोन निष्पाप व्यक्तींची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी(दि. 22) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या दुहेरी हत्याकांडामुळे मनमाड परिसरात खळबळ उडाली असून, मनमाड शहर पोलिसांनी तत्परता दाखवत पाठलाग करून आरोपीला अटक केली.
मनोज नंदू बोमराज (रा. बागमार, ता. पांडाणा, जि. खांडवा, मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या संशयित माथेफिरूचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र प्रकाश खैरनार यांनी फिर्याद दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार पहाटे अडीचच्या सुमारास तीन नागरिकांनी पोलीस ठाण्यात येऊन माहिती दिली की, पुणे-इंदूर महामार्गावरील अलंकार टॉकीजसमोर एका वेडसर इसमाने झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर मोठे दगड टाकून त्याला बेदम मारहाण केली. पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, सुमारे 35 ते 40 वर्षे वयाचा एक अनोळखी पुरुष रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्यास तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले, मात्र मालेगाव येथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. यानंतर पोलीस पथक आरोपीचा शोध घेत असतानाच, भारत पेट्रोल पंपाजवळ एसटी स्टँडच्या वॉलकम्पाऊंड लगत आणखी एक व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. त्याच्या अंगावर आणि डोक्यावरही मोठे दगड टाकण्यात आले होते. मृतदेहाची झडती घेतली असता, त्याच्या खिशातून मिळालेल्या कागदपत्रांवरून त्याची ओळख बाळू प्रल्हाद अमृतसागर (वय 35, रा. राजवाडा, खेडा, ता. जि. धुळे) अशी पटली.

पोलिसांवरही दगडफेक
हत्येनंतर रेल्वे ब्रिजखालून रेल्वे स्टेशनकडे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयित मनोज बोमराज याला पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने घेरले. पोलिसांना पाहताच त्याने पोलिसांच्या अंगावरही जोरदार दगडफेक सुरू केली. मात्र, पोलिसांनी फायबर ढालींच्या मदतीने स्वतःचा बचाव करत शिताफीने त्याला ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध मनमाड शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (खून) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Two people bludgeoned to death with stones by a deranged man in Manmad.

 

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago