शालार्थ आयडी घोटाळ्यातही भोंदू खरातचे कनेक्शन

सिडको : प्रतिनिधी
स्वयंघोषित कॅप्टन तथा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, शालार्थ आयडी घोटाळ्यातही त्याचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपास यंत्रणांकडून या संबंधातील दुवे शोधले जात असून संबंधित सर्व बाबींची पडताळणी केली जात आहे.
18 मार्च रोजी अटक करण्यात आलेल्या अशोक खरात याला न्यायालयाने वारंवार पोलीस कोठडी सुनावली आहे. 24 मार्च रोजी कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता 29 मार्चपर्यंत कोठडी वाढवण्यात आली होती.आयपीएस अधिकारी जायचे. तिथे केवळ शोषणच होत नव्हते, तर बड्या अधिकार्‍यांच्या पत्नींची अदलाबदल करण्याचे प्रकारही घडत होते. खरात हा स्वतः शोषण करण्यासोबतच मुली पुरवण्याचे कामही करत होता. या विधानामुळे राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेच्या नैतिकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.वडेट्टीवारांच्या या आरोपांनंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या आरोपांचा तीव्र निषेध करत वडेट्टीवारांना थेट आव्हान दिले आहे. विरोधी पक्षनेत्यांसारख्या जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने पुराव्याशिवाय असे विधाने करणे चुकीचे आहे. जर तुमच्याकडे या दाव्यांचे काहीही ठोस पुरावे असतील, तर ते सार्वजनिक करा किंवा पोलिसांकडे द्या, असे बावनकुळे म्हणाले.पुराव्याशिवाय अशा प्रकारच्या चर्चा करणे म्हणजे प्रशासकीय अधिकार्‍यांची नाहक बदनामी करणे आहे, असेही भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशासकीय वर्तुळात अस्वस्थता-एकीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, दुसरीकडे वरिष्ठ अधिकारी वर्गामध्ये या विधानांमुळे मोठी अस्वस्थता पसरली आहे. वडेट्टीवार यांनी कोणत्याही विशिष्ट अधिकार्‍याचे नाव घेतले नसले तरी, सरसकट ’अनेक अधिकारी’ असा उल्लेख केल्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Fake Kharat’s connection in Shalarth ID scam too

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *