नाशिक

लखाणेत बनावट मद्यनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त

कारवाईत वाहनासह साडेचौदा लाखांचा मुद्देमाल जप्त

मालेगाव : प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क मालेगाव विभागाच्या पथकाने तालुक्यातील लखाणे शिवारातील बांधीव पत्राशेडमध्ये छापा टाकून बनावट मद्य निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत वाहनासह 14 लाख 51 हजार 240 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
लखाणे शिवारातील बांधीव पत्राशेडमध्ये बनावट मद्य निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मालेगाव पथकाला मिळाली होती. या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला असता, मद्यनिर्मितीसाठी लागणारे साहित्य, विविध प्रकारच्या बनावट मद्याच्या भरलेल्या व रिकाम्या बाटल्या, तसेच मद्यसाठा वाहतुकीकरिता वापरण्यात येणारी सफेद चार चाकी वाहन (एमएच 18- एम 3680) व एक दुचाकी (एमएच 08- एआर 6418) या दोन्ही वाहनांसह 14 लाख 51 हजार 240 रुपयांचा राज्यात वाहतुकीस व विक्रीस प्रतिबंध असलेला व बनावट मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या गुन्ह्यात मद्यसाठानिर्मिती करणारा व मद्यसाठा घेणारा पुरवठादार, तसेच जप्त वाहनमालक यांच्याविरोधात व इतर ज्ञात-अज्ञातांंविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. ही कारवाई मालेगाव विभागाचे निरीक्षक लीलाधर पाटील, दुय्यम निरीक्षक सागर नलावडे, रियाज शेख, कळवण विभागाचे निरीक्षक सी. एच. पाटील, आर. जे. पाटील, दुय्यम निरीक्षक मनीष पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक वंदना देवरे, जवान दीपक गाडे, श्याम पानसरे, प्रवीण अस्वले, दिगंबर पालवी, अण्णा बहिरम, गोकुळ परदेशी, राकेश पगारे, अमित गांगुर्डे, राजाराम सोनवणे, यागेश म्हस्के, गणेश शेवगे, अनिल जाधव, राजेंद्र चव्हाणके, संतोष बोराडे व संजय शिंदे यांच्या
पथकाने केली.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 days ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 days ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 days ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 days ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 days ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 days ago