जामगावला रोटाव्हेटर यंत्रात अडकून शेतकर्‍याचा मृत्यू

                                       गोरख लक्ष्मण आव्हाड

सिन्नर : प्रतिनिधी
रोटाव्हेटर यंत्रात अडकून शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील जामगाव येथे रविवारी (दि. 19) रात्री आठच्या सुमारास घडली. गोरख लक्ष्मण आव्हाड (वय 55) असे अपघातात मृत्यू झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. ऐन दिवाळीत झालेल्या या घटनेने आव्हाड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जामगाव येथील गोरख आव्हाड रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आपल्या घरापासून पाचशे फूट अंतरावर असलेल्या शेतात ट्रॅक्टर घेऊन रोटा मारण्यासाठी गेले होते.
रात्री आठ वाजेच्या सुमारास ते घरी न परतल्याने त्यांचे चुलतबंधू शरद सदाशिव आव्हाड (वय 49) शेतात पाहण्यासाठी गेले. त्यावेळी गोरख रोटरच्या पात्यांमध्ये अडकलेला दिसला. त्यानंतर त्यांनी घरच्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर गोरख आव्हाड यांची पत्नी, मुलगा घटनास्थळी धावत आले. ट्रॅक्टर सुरू करून रोटर वर उचलत रोटरच्या पात्यामधून गोरख यांना बाहेर काढून त्यांना सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. या संदर्भात सिन्नर पोलिसांत शरद आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गोसावी करत आहेत.
दरम्यान, अत्यंत कष्टाळू असलेल्या गोरख यांनी तीन वाजेनंतर दोन शेतांमध्ये रोटा मारण्याचे काम केले होते. बांधाजवळ शेवटचा चक्कर बाकी असताना रोटरची उजव्या बाजूची पिन निसटली. त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर न्यूट्रल करून ही पिन बसवत असताना त्यांची पॅन्ट रोटरमध्ये अडकली. त्यामुळे ते आत ओढले गेल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज आहे.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ठार झाल्याची अफवा

जामगाव येथील गोरख आव्हाड यांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची अफवा या परिसरात स्थानिकांनी पसरवली होती. दरम्यान, वन विभागाला यासंदर्भात तशी माहिती देण्यात आली होती. वन विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक कल्पना वाघेरे, वनपरिक्षेत्र अधिकारी पी. जी. सातारकर आणि अन्य वन कर्मचार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन या घटनेची पाहणी केली. गावातील सरपंच आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते. त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू रोटाव्हेटर यंत्रात अडकूनच झाल्याचे सिद्ध झाले. याशिवाय सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी हा मृत्यू वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नव्हे, तर रोटाव्हेटरमध्ये अडकून झाल्याचे सांगितल्याने या प्रकरणावर पडदा पडला.

 

Gavkari Admin

Recent Posts

शेतकऱ्यांचे दिल्लीत कांद्याच्या माळा घालून अर्धनग्न आंदोलन

कांदा प्रश्नासाठी शेतकऱ्यांचे दिल्लीत कांद्याच्या माळा घालून अर्ध नग्न आंदोलन स्वतंत्र भारत पक्षाचा आंदोलकांना पाठिंबा…

5 hours ago

सिडकोत हिट अँड रन; शॉपिंग सेंटरजवळ झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू

शॉपिंग सेंटरजवळ झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू सिडको : दिलीपराज सोनार जुने सिडको परिसरातील शॉपिंग…

21 hours ago

लाडक्या बहिणींबाबत शासनाने घेतला आता हा निर्णय

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीला स्थगिती लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मुंबई: राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा…

2 days ago

राधाकृष्ण नगरात स्वयंघोषित भाईचा राडा

राधाकृष्णनगरमध्ये परप्रातीय स्वयंघोषित भाईचा राडा गल्लीतील नागरिकांना कापून टाकण्याची धमकी देत दहशत सातपूर : सातपूर…

2 days ago

अपघातग्रस्त तरुणांवर उपचारास सिव्हिलचा नकार, छावा संघटना झाली आक्रमक, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार तक्रार

जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांना दाखल करण्यास नकार — छावा क्रांतीवीर सेनेकडून रुग्णालय प्रशासनाचा तीव्र निषेध!…

2 days ago

वृद्धेच्या गळ्याला चाकू लावत उकळले वीस लाख, पवन पवार विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

सिडको : विशेष प्रतिनिधी वृद्धेच्या घरी जाऊन चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत तिच्याकडून…

2 days ago