गोरख लक्ष्मण आव्हाड
सिन्नर : प्रतिनिधी
रोटाव्हेटर यंत्रात अडकून शेतकर्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील जामगाव येथे रविवारी (दि. 19) रात्री आठच्या सुमारास घडली. गोरख लक्ष्मण आव्हाड (वय 55) असे अपघातात मृत्यू झालेल्या शेतकर्याचे नाव आहे. ऐन दिवाळीत झालेल्या या घटनेने आव्हाड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जामगाव येथील गोरख आव्हाड रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आपल्या घरापासून पाचशे फूट अंतरावर असलेल्या शेतात ट्रॅक्टर घेऊन रोटा मारण्यासाठी गेले होते.
रात्री आठ वाजेच्या सुमारास ते घरी न परतल्याने त्यांचे चुलतबंधू शरद सदाशिव आव्हाड (वय 49) शेतात पाहण्यासाठी गेले. त्यावेळी गोरख रोटरच्या पात्यांमध्ये अडकलेला दिसला. त्यानंतर त्यांनी घरच्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर गोरख आव्हाड यांची पत्नी, मुलगा घटनास्थळी धावत आले. ट्रॅक्टर सुरू करून रोटर वर उचलत रोटरच्या पात्यामधून गोरख यांना बाहेर काढून त्यांना सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. या संदर्भात सिन्नर पोलिसांत शरद आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गोसावी करत आहेत.
दरम्यान, अत्यंत कष्टाळू असलेल्या गोरख यांनी तीन वाजेनंतर दोन शेतांमध्ये रोटा मारण्याचे काम केले होते. बांधाजवळ शेवटचा चक्कर बाकी असताना रोटरची उजव्या बाजूची पिन निसटली. त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर न्यूट्रल करून ही पिन बसवत असताना त्यांची पॅन्ट रोटरमध्ये अडकली. त्यामुळे ते आत ओढले गेल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज आहे.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ठार झाल्याची अफवा
जामगाव येथील गोरख आव्हाड यांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची अफवा या परिसरात स्थानिकांनी पसरवली होती. दरम्यान, वन विभागाला यासंदर्भात तशी माहिती देण्यात आली होती. वन विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक कल्पना वाघेरे, वनपरिक्षेत्र अधिकारी पी. जी. सातारकर आणि अन्य वन कर्मचार्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन या घटनेची पाहणी केली. गावातील सरपंच आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते. त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू रोटाव्हेटर यंत्रात अडकूनच झाल्याचे सिद्ध झाले. याशिवाय सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी हा मृत्यू वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नव्हे, तर रोटाव्हेटरमध्ये अडकून झाल्याचे सांगितल्याने या प्रकरणावर पडदा पडला.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…