आत्मदहनाचा दिला इशारा : कुंभमेळा आयुक्तांनी केलेल्या हेटाळणीचा निषेध
♦ आ. खोसकरांच्या उपस्थितीत जेसीबी आणि हायवा बाहेर काढले
♦ साधू-महंतांचा पाठिंबा; आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याची तयारी
♦ बाधित शेतकर्यांबाबत सरकार अद्यापही गंभीर नसल्याचे चित्र
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा विकासकामांनी बाधित शेतकरी आंदोलन अधिक चिघळणार असे दिसत आहे. त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने शासनाने गोदावरीला घाट बांधण्याचे व त्यासाठी रस्ते बांधणीचे काम हाती घेतले आहे. त्याचसोबत डीपी रस्ते, साधुग्राम, कचरा डेपो यासाठी जमिनी घेण्यात येत आहेत. शेतकर्यांना विश्वासात न घेता थेट कामाला सुरुवात केली आहे. सरकारच्या या अतातायी प्रकाराने मागच्या आठवड्यात शेतकर्यांनी एकत्र येत घाटांचे काम बंद पाडले. मात्र, ताबडतोब दुसर्या दिवशी काम सुरू झालेले पाहून शेतकरी साखळी उपोषणाला बसले आहेत. तथापि, शासनाने त्यांची दखल घेतली नाही. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह शनिवारी येथे आले असता त्यांनी तुम्हाला सरकारी भावाने मोबदला मिळेल, तुम्ही घ्या अथवा नका घेऊ, असे बोलले तसेच त्यांनी शेतकर्यांना वेळ दिला नाही, मात्र मंदिर आणि कुशावर्तावर जाऊन साधू-महंतांच्या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि रविवारी सकाळपासून आंदोलन स्थळावर जळाऊ लाकडाचे ढिगारे आणून टाकले. बाधित शेतकर्यांनी आम्हाला न्याय मिळणार नसेल तर आम्ही आत्मदहन करतो, असा पवित्रा घेतला आहे.
रविवारी आंदोलन स्थळावर आमदार हिरामण खोसकर यांनी भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत कामाच्या जागेवर असलेले जेसीबी यंत्र, हायवा ट्रक यासारखी यंत्रसामग्री दूर हलवण्यास सांगण्यात आले. यापुढे कोणत्याही प्रकारे काम सुरू केल्यास शेतकर्यांचा उद्रेक होऊन घडणार्या प्रकाराला सरकार जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे. रविवारी आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दोन आखाड्यांच्या जमिनी बाधित होत असल्याचे सांगितले तसेच आपण शेतकर्यांच्या पाठीशी आहोत. आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. उपस्थित साधूंनी शेतकर्यांची मुले उपाशी ठेवण्याचे काम जमीन घेतल्याने होणार असेल तर आम्हाला तो कुंभमेळा नको, अशी भूमिका घेतली आहे.
निषेधाचे फलक काढण्याचा मोघम सांगावा
आंदोलकांनी आपल्या मागण्या सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आंदोलन स्थळावर फलक लावले व त्यावर निषेध व्यक्त केला आहे. याबाबत निषेधाचे फलक काढून घ्या, असा मोघम निरोप सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून आंदोलकांना देण्यात येत आहे. तसेच विविध कामांसाठी बाधित असलेले शेतकरी संघटित होऊन दाद मागत असताना जलसंपदा विभागाचे अधिकारी आमच्या पुरते बोला, असे म्हणून शेतकर्यांमध्ये फूट पाडत असल्याचे बाधितांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे कचरा डेपोच्या बाबत ताबा पावती तयार करून शेतकर्यांची जमीन घेतली व त्यासाठी उभ्या पिकात जेसीबी चालवला म्हणून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. यापुढे अशा प्रकारे कायद्याचा धाक दाखवत शेतकर्यांच्या जमिनी नापीक करणे अथवा ताब्यात घेण्याचे प्रकार झाले तर आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
Farmers affected by lions attack Trimbakala Ghat roads
कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या शहापूर: प्रतिनिधी 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानानं…
नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…
खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…