चार तास रस्ता ठप्प; तंटामुक्त समितीच्या मध्यस्थीने मार्ग
मालेगाव : प्रतिनिधी
चटाणेपाडा चौफुलीजवळ शुक्रवारी (दि.14) दुपारी रस्त्यालगतची काटेरी झुडपे हटविण्याच्या कामाला स्थानिक शेतकर्याने विरोध केला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्यांनी चौफुलीवरच काटेरी झुडपे रस्त्यावर फेकून वाहतूक अडवली. तब्बल चार तास रस्ता ठप्प ठेवत आंदोलन छेडले. अखेरीस तंटामुक्त समितीच्या मध्यस्थीने मार्ग काढत वाहतूक सुरळीत केली.
अलीकडेच स्थानिक शेतकर्यांनी लोकसहभागातून झुडपे हटविण्याची मोहीम सुरू केली. काही हिस्सा मोकळा होत असतानाच ग्रामपंचायत सदस्य यांनी, नकाशा आणल्याशिवाय एकाही झाडाला हात लावू नका, अन्यथा पोलिसांत तक्रार करीन, असा इशारा दिला. या वक्तव्यामुळे शेतकर्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले आणि काटेरी झुडपे रस्त्यावर
फेकत वळवाडे-अंबासन मार्गावरील वाहतूक रोखून धरली. यामुळे सर्व वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. वाघखोर्यातील बाळंतपणानंतर घरी परतणार्या महिलेचे वाहनही या अडथळ्यांमुळे अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यातील दोन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अखेरीस तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अरुण कोर आणि गावातील प्रतिष्ठितांनी परिस्थिती शांत केली. नंतर जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील काटेरी झुडपे हटवून मार्ग पुन्हा सर्वांसाठी खुला करण्यात आला.
नागरिकांमध्ये नाराजी
वळवाडे-अंबासन हा महत्त्वाचा मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून काटेरी झुडपांच्या अतिक्रमणामुळे अरुंद झाला आहे. यामुळे वाहनचालक, शाळकरी मुले आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडत होते. काही वर्षांपूर्वी या मार्गावर दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना आजही स्थानिकांच्या स्मरणात आहे. वाढत्या वाहतुकीमुळे अपघाताचा धोका अधिक तीव्र होत असल्याची भीती ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वेळोवेळी व्यक्त केली होती. मात्र, तक्रारींना प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…