नाशिक

डोक्यावर वाळलेली पिके घेऊन शेतकर्‍यांचा ठिय्या!

दिंडोरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; मदत न मिळाल्यास उपोषण

दिंडोरी : प्रतिनिधी
पाण्याअभावामुळे पिकांचे झालेले अतोनात नुकसान आणि हवालदिल झालेला शेतकरी वर्ग… या पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करून भरपाई द्यावी, या मागणीसाठी संतप्त शेतकर्‍यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. हातात आणि डोक्यावर वाळलेले भात, वरई व सोयाबीनच्या पिकांचे पेंढे धरून शेतकर्‍यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले. यासंदर्भात तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तौफिक मणियार व माजी सरपंच संतोष रहिरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दिंडोरी हा आदिवासीबहुल तालुका असून, येथील सर्वसामान्य शेतकरी मुख्यत्वे पावसाच्या (वरच्या) पाण्यावरच अवलंबून असतो. मात्र, पावसाअभावी भातासह इतर पिके पूर्णपणे जळून नष्ट झाली आहेत.
आंदोलनात श्याम गवारे, गुलाब गायकवाड, योगेश कराड, संदीप भेरे, हिरामण गायकवाड, दशरथ शेखरे, छगन शेखरे, हरी शेखरे, कांतिलाल शेखरे, मुकुंदा शेखरे, माणिक शेखरे, विजय शेखरे, हनुमान शेखरे, काशीनाथ शेखरे, दौलत शेखरे, काशीनाथ गायकवाड, शंकर गायकवाड, कैलास गायकवाड, मोहन गायकवाड, हिरामण शिंदे, सोनीबाई गायकवाड, जयराम गायकवाड, देवीदास गायकवाड, मोतीराम शेखरे, धनराज माळेकर, विठ्ठल माळेकर यांच्यासह तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थ सहभागी झाले
होते.

Farmers stage a sit-in protest with withered crops on their heads!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

9 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

9 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

10 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

10 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

10 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

10 hours ago