सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या आणि ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणार्या पुरातन वावी वेशीची अतिक्रमणामुळे पडझड होत असून, तिचे मूळ सौंदर्य धोक्यात आले आहे. वेशीलगतच्या सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणे हटवून वाहतुकीचा मार्ग मोकळा करावा, तसेच वेशीचे जतन, दुरुस्ती व नूतनीकरण तातडीने करावे, अशी मागणी सिन्नर येथील नागरिक प्रवीणचंद्र निवृत्ती पन्हाळे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
12 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनात पन्हाळे यांनी वावी वेशीच्या सद्यस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ऐतिहासिक सिन्नर शहराला पूर्वी संरक्षणासाठी सात वेशी होत्या. त्यापैकी वावी वेस ही महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू असून, तिचे दगडी बांधकाम अतिक्रमण आणि दुर्लक्षामुळे खराब होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
वेशीलगत नगरपरिषदेने बांधलेल्या गाळ्यांच्या परिसरात व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने येण्या-जाण्याच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी विनापरवानगी बांधकाम झाल्याने वेशीच्या मूळ वास्तूला धक्का पोहोचत आहे. व्यावसायिक आणि ग्राहकांच्या वाहनांमुळे रस्ता अरुंद झाला असून, लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वेशीचे जुने दरवाजे व अन्य ऐतिहासिक साहित्याची चोरी किंवा तोडफोड रोखण्यासाठी सुरक्षाव्यवस्था करावी, अशी मागणीही केली आहे. अतिक्रमणे हटविल्यास वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शाळकरी मुलांना सुरक्षितपणे ये-जा करता येईल, असे निवेदनात नमूद
केले आहे.
पदाधिकार्यांनाही साकडे
सिन्नरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी आणि नगरपरिषदेने वावी वेशीची दुरुस्ती व देखभाल करावी, अशी विनंती पन्हाळे यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार राजाभाऊ वाजे आणि सिन्नर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
Historic ‘Vavi Ves’ Choked by Encroachments!
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…