दिक्षी : प्रतिनिधी
टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सध्या टोमॅटोला बाजारात क्रेटला अवघा 200 ते 250 रुपये भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याची स्थिती आहे. टोमॅटो पिकासाठी शेतकर्यांना एकरी सुमारे दोन लाखांच्या पुढे खर्च करावा लागतो.
वातावरणाच्या बदलमुळे महागडी औषधे फवारावी लागले. त्यामुळे साहजिकच खर्च वाढला. त्यात टोमॅटो खुडण्यासाठी क्रेटमागे सुमारे 25 रुपये मजुरी घेतली जाते तर बाजार समितीत माल वाहून नेण्यासाठी क्रेटमागे सुमारे 25 रुपये वाहतूक खर्च येत आहे. त्यामुळे मिळणार्या दराच्या तुलनेत उत्पादन, मजुरी आणि वाहतूक खर्च मोठा असल्याने शेतकर्यांच्या हातात अपेक्षित उत्पन्न राहत नाही. टोमॅटोच्या दरात सातत्याने होणार्या चढ-उतारामुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कधी भाव वाढतो तर काही दिवसांतच दरात मोठी घसरण होते. त्यामुळे बाजारातील अनिश्चिततेचा फटका टोमॅटो उत्पादकांना बसत आहे. उत्पादन खर्च वाढत असताना टोमॅटोला मिळणारा कमी भाव शेतकर्यांसाठी चिंतेचा विषय बनला असून, दरवाढीच्या प्रतीक्षेत टोमॅटोची ‘लाली’ही फिकी पडल्याचे चित्र शेतशिवारात दिसून येत आहे.
टोमॅटो पिकासाठी एकरी जवळपास दोन लाख रुपये खर्च येतो. सध्या क्रेटला 200 ते 250 रुपये भाव मिळत असून, त्यातून खुडणीसाठी 25 रुपये आणि वाहतुकीसाठी 25 रुपये खर्च होतो. मजुरी, औषधे, खते, पाणी आणि इतर खर्च पाहता हातात काहीच शिल्लक राहत नाही. दरात अशीच घसरण सुरू राहिली तर टोमॅटो उत्पादक शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. शासनाने बाजारभाव स्थिर राहण्यासाठी उपाययोजना करून शेतकर्यांना दिलासा द्यावा.
-पंकज चौधरी,
टोमॅटो उत्पादक शेतकरी, दिक्षी
Farmers unhappy as tomato prices drop.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…