नाशिक

खळबळजनक : मध्यरात्री तरुणाची निर्घृण हत्या

सुदर्शन चव्हाण खून प्रकरणाने परिसर हादरला

मनमाड( आमिन शेख) : येथील ईदगाह परिसरात काल मध्यरात्री एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. सुदर्शन सूरज चव्हाण असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व काही संशयतींना अटक केली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुदर्शन चव्हाण याच्यावर काल मध्यरात्री काही तरुणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, सुदर्शनचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते. भरवस्तीत झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. सुदर्शनचा खून नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. जुना वाद, वैयक्तिक शत्रुत्व किंवा इतर काही कारणातून हा प्रकार घडला का, याचा शोध पोलीस घेत आहेत. भररस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुदर्शनला पाहून परिसरातील नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच मनमाड उपविभागीय पोलिस अधीक्षक बाजीराव महाजन व पोलिस निरीक्षक विजय करे यांनी फौज फाट्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत काही संशयित तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असून, या गुन्ह्यात आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.पुढील तपासासाठी मृतदेह स्थानिक शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे सुदर्शनच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी परिसरातून होत आहे.

Sensational: Brutal murder of a young man in the middle of the night

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago