मुंबई-आग्रा महामार्गावर गॅस टँकरचा भीषण अपघात;

राहूड घाट बनला अपघातांचा स्पॉट: मुंबई-आग्रा महामार्गावर गॅस टँकरचा भीषण अपघात; वाहतूक वळवली
चांदवड,: वार्ताहर

– मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवड येथील राहूड घाटात अपघातांची मालिका सुरूच असून, सोमवारी रात्री येथे एक भीषण अपघात झाला. एका ट्रकने कट मारल्याने भारत गॅसचा बुलेट टँकर पलटी झाला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली आहे. या घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे.
या अपघातात एका टोमॅटोने भरलेल्या ट्रकचा आणि एका कंटेनरचाही समावेश होता. अपघात इतका भीषण होता की गॅस टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडू लागला. यामुळे संपूर्ण परिसरात गॅसचा तीव्र वास पसरला आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची अधिकृत माहिती नाही. मात्र, अपघातात जखमी झालेल्या टँकर चालकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, पण त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
अपघाताचं कारण ठरलं रस्त्यावर पडलेलं पोकलेन
या भीषण अपघाताला मुख्य कारण ठरलं याच ठिकाणी रविवारी तुटून पडलेलं एक पोकलेन मशीन. महामार्ग प्राधिकरण किंवा टोलनाका प्रशासनाने ते मशीन वेळेत बाजूला न केल्यामुळे सोमवारी रात्री हा दुसरा अपघात घडला, असं बोललं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून या घाटात अपघातांची संख्या वाढली आहे, ज्यामुळे महामार्ग प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
वाहतुकीत मोठा बदल
गॅस गळतीमुळे महामार्गावरील वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली आहे. नाशिक-धुळे महामार्गावरील वाहतूक चांदवडजवळ बंद करण्यात आली असून, पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत:
* नाशिककडून धुळ्याकडे जाणारी वाहतूक आता चांदवड-मनमाडमार्गे मालेगाव-धुळे अशी वळवण्यात आली आहे.
* धुळ्याकडून नाशिककडे येणारी वाहतूक मालेगाव-देवळा-सोग्रस फाटा-नाशिक अशी वळवण्यात आली आहे.
बचावकार्य सुरू
अपघाताची माहिती मिळताच चांदवड पोलीस, अग्निशमन दल आणि सोमा टोलवेज कंपनीचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. गॅस गळती थांबवण्यासाठी मनमाड आणि सिन्नरमधून विशेष पथके बोलावण्यात आली आहेत. गॅस दुसऱ्या टँकरमध्ये सुरक्षितपणे भरण्याचं काम सुरू आहे. गॅस गळती थांबवण्याचं काम जोखमीचं असल्याने त्याला संपूर्ण दिवस लागू शकतो, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. अपघातांची ही मालिका थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

’समृद्धी’वरून मुंबईला निघताय? आधी ब्लॉकच्या वेळा पाहा!

♦ भरवीर ते इगतपुरी इंटरचेंज 11 दिवस वाहतूक निर्बंध ♦ दिवसातून तीन वेळा एक तास…

3 minutes ago

500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात एसआयटी करणार तपास

गृहमंत्री फडणवीसांचे मुंबई पोलीस आयुक्तांना विशेष पथक स्थापण्याचे आदेश मुंबई : प्रतिनिधी मनोज जरांगे पाटील…

11 minutes ago

चक्रीवादळ ‘अर्नाब’चा धोका वाढला

 इस्रोने टिपले रौद्ररूप, आंध्र किनारपट्टीकडे झेप नवी दिल्ली : प्रतिनिधी बंगालच्या उपसागरात घोंघावणार्‍या चक्रीवादळ ’अर्नाब’…

22 minutes ago

डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा निकाल

- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…

21 hours ago

देशातील तपास यंत्रणा

- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्‍यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…

21 hours ago

साखर कारखानदारीची घरघर थांबणार कधी?

- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…

21 hours ago