आस्वाद

‘एफडीए’ला आली जाग…

गेल्या काही दिवसापासून अत्यंत नावाजलेल्या अशा खाद्यपदार्थांच्या दुकानांचं नाव समोर आले, का तर म्हणे ’एफडीए’च्या अंतर्गत झालेल्या कारवाईमुळे. लोक आता खाण्याच्या बाबतीत बर्‍यापैकी जागरूक होणार असं वाटतंय, पण ते फक्त थोड्या काळासाठी… कारण ’घर की मुर्गी दाल बराबर’ ही म्हण ऐकली होती आणि ती प्रत्यक्षात आपण रोजच अनुभवतो घरात. शंभर टक्के पौष्टिक अशा पदार्थांनी काही बनवून खाऊ घातलं ना तरी घरच्या माणसांना बाहेरच्या पदार्थाची चवच आवडते, का तर काही केल्या बाहेरच्या पदार्थाची चव घरच्या पदार्थाला येतच नाही. आचार्‍याच्या हाताला चव असते. पदार्थ हे कलाकुसरतेने वापरले जात असतात. कारण हे पदार्थ चविष्ट बनण्यासाठी अजिनोमोटो, विविध मसाले आणि सोडा यांचा भरपूर वापर करून बनवलेले असतात जेणेकरून ते चविष्ट आणि मसालेदार व्हावेत. शेवटी दुकानदाराचा हेतू हा ग्राहक वाढवणे, ग्राहक टिकवून ठेवणे इतकाच असतो, पण घरच्या अन्नपदार्थात काळजी हा पहिला विषय-हेतू असतो. आपल्या घरच्यांचे आरोग्य हा विशेष हेतू असतो.
तुम्ही म्हणाल, सर्वच विक्रेते असे असू शकतात का, तर नाही. गुणवत्ता,
दर्जेदारपणा हे काहींच्या तत्त्वाात असतं. ते पूर्णतः दर्जेदार, शुद्धता जपण्याचा प्रयत्न करत असतात. शेवटी इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतकं काही बनवण्यात गडबड, गोंधळ होणे साहजिक आहे.
एक साधं उदाहरण बघू या. काही व्यवसायांत असं म्हणतात की, जी दहा वर्षांपूर्वी गुणवत्ता खाद्यपदार्थाची होती ती आज नाही मिळत. थोडाफार त्या चवीत वगैरे बदल झालाय. कारण आताची आपली पिढी ही सगळं हायब्रिड आयुष्य जगते आहे. अक्षरशः फळंसुद्धा कृत्रिमरीत्या पिकवली जातात. त्यामुळे दुधाची, तुपाची, तेलाची गुणवत्ता, वितरण हा फक्त त्या व्यावसायिकाचाच नाही, तर त्याला माल पुरवणार्‍या सर्वच घटकांचा असू शकतो आणि विषय प्रत्येक व्यवसायावर धाड घालून त्यांची गुणवत्ता तपासणी हा आपल्यासाठी एक खूप चांगला भाग आहे. त्यातून कदाचित ग्राहकापर्यंत पोहोचण्याची गुणवत्ता आणि स्वच्छता या दोन्ही टिकवून व्यवसायात सुधारणा अनेक व्यावसायिक करू शकतात. काही वेळेला पैसे मिळवण्याच्या आणि
स्पर्धेच्या नादात काही चुका, त्रुटी या व्यावसायिकाकडून होऊ शकतात आणि त्या सुधारण्याची एक संधी कदाचित एफडीए देत आहे.
तसं लोक घरात कमी आणि बाहेर खाणं जास्त पसंत करायला लागलेत. जंकफूड, फास्टफूड, कुठलाही बाहेरचा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतो. बाहेर खाण्याचे, एन्जॉय करण्याची सवय प्रत्येक गटातल्या आणि प्रत्येक माणसाला लागली आहे. त्यामुळे इतक्या विश्वासाने ग्राहक आपल्यापर्यंत पैसे देऊन पोहोचतोय तर त्याला
दर्जेदार, गुणवत्तापूर्ण मिळणे साहजिकच अपेक्षित आहे. त्यामुळे ग्राहकांना
दर्जेदार, गुणवत्तापूर्ण पदार्थ मिळवून देण्याचे उत्तम साधन आहे.

 

FDA wakes up…

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

आखिर कब तक चुप रहेगी?

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः॥ भावार्थ : जिथे स्त्रीचा…

7 minutes ago

’रामायण’ची आधुनिक झेप

- मनीषा चौधरी चित्रपटसृष्टीत सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे, नितेश तिवारी दिग्दर्शित आणि…

14 minutes ago

व्हिटॅमिन बी-12 च्या मदतीने केली नवी रिचार्जेबल बॅटरी

- डॉ. किशोर पवार मानवी शरीरासाठी जीवनसत्त्वाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे याची कल्पना सर्वांनाच आहे.…

20 minutes ago

आत्महत्या हा उपाय नाही…

- ज्योती काळे-जाधव अलीकडच्या काळात घडणार्‍या आत्महत्यांच्या घटना मनाला अस्वस्थ करून जातात. पुण्याची पायल, काल…

26 minutes ago

दिवाळी संपली; फराळाच्या आठवणी कायम

- प्रणाली देशमुख तसा खूप मोठा परिवार आहे यांचा! पिढ्यान्पिढ्या आपल्याला अगदी मनपसंद, चमचमीत, तिखट-गोड…

30 minutes ago

दिशादर्शकांवर ‘भाऊ-दादां’ची मक्तेदारी!

- वाहिद बागवान रस्ता कुठे जातो, हे सांगण्यासाठी उभारलेल्या दिशादर्शक कमानींवर आता कोणत्या नेत्याचा वाढदिवस…

34 minutes ago