लहान मुलं नेहमीच किती आनंदी, निरागस, उत्साही दिसतात. कारण त्यांना फक्त खेळणं, बागडणं, छान-छान खाणं, घट्ट पुरवून घेणे माहीत असते. हट्ट पुरवले नाही तर त्यांच्याही भावना दुखावतात. आणि त्यांना वाईट वाटू नये. ते मूल रडू नये म्हणून पालक सर्व घेऊन देत असतात. यालाच भावना जपणं असं म्हणू शकतो. पण हीच भावना मोठेपणी मुलांनीही सर्वांसाठी जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
उदा. नोकरी करणारी जोडपी आपण बघतो. दोघांनी दैनंदिन कामे सारखे वाटून घेतली तर दोघेही आनंदात राहतात. पण फक्त स्त्रीवरच ही जबाबदारी आली तर ती चिडचिडते, भांडण होतात किंवा कामाचा ताण पडून आजारी पडणे, मुलांकडे दुर्लक्ष अशा गोष्टी घडतात. अशा वेळी मुलांना पाळणाघरे, घर कामाला बाई असे पर्याय वेळेअभावी जवळ केले जातात. पण मुलांना जणू आई-वडिलांना आपल्यासाठी वेळच नाही असं वाटू लागते. मग ते टीव्ही, मोबाइल, मित्र-मैत्रिणी यात वेळ घालवतात. त्यांचे मन भावना कुणी समजून घेत नाही. प्रत्येक गोष्ट पैशाने देता येत नाही. त्यांना आई-वडिलांचा वेळ हवाहवासा असतो. ते तोंडाने सांगत नाही, पण ते आपणच ओळखायला हवं.
मुलांना हिंदू संस्कृती, घरचे जेवण या सवयी पाहिजे. नाहीतर बाहेरचं खाणं, पार्टी करणं, फॅशन मागे धावणं या गोष्टी घडू लागतात. त्यामुळे पालकांनी मुलांच्या भावना जपायला हव्या. तसेच मुले मोठी होऊ लागली की समज येताच आई- वडील, शेजारी, नातेवाईक यांच्या आदर ठेवत भावना जपता यायला पाहिजे.
जेव्हा आई-वडील रागावतात याचा मुलांना राग येतो, पण ते अनुभवाने मोठे झालेले असतात. आपल्या मुलावर कोणतेही संकट येऊ नये, कधी काही कमी पडू नये म्हणून ते जपतात.वाईट सवयीपासून, व्यर्थ खर्चापासून दूर राहावे, असे पालकांना वाटते.
आपल्या शेजारी आपण किती जमवून घेतो. एकमेकांचे विचारपूस करणे, संकटात मदत करणे या भावना जपल्या तर चांगले शेजारी म्हणून आपणही मानले जातो. अन्यथा काही ठिकाणी एकमेकांशी स्पर्धा चालू असते. त्यांनी हे घेतले मग आपण केव्हा घेऊ. हा श्रीमंत आहे आपण त्यांच्यापासून दूरच राहावं, ते अतिशय गर्विष्ठ आहेत. वगैरे वगैरे मनात भावना घर करून राहतात. बरेच लोक माणुसकीप्रिय वागतात. यामुळे आपापली स्वभावानुसार चांगली वाईट भावनामुळे समाजातील प्रतिमा ठरत असते. एखादी व्यक्ती हुशार असली तर चार लोक त्या व्यक्तीकडे सन्मानाने विचारपूस करतात तेव्हा त्यांची गुणांचे जरूर कौतुक करावे. जेव्हा मुलांची लग्न होतात सून घरात येते त्यावेळी सुनेने घरातल्यांच्या भावनांचा आदर ठेवला पाहिजे. घरातल्यांनीही सुनेच्या भावना जपायला हव्यात. मग समस्या आपोआप दूर होतात. मुलींनी सासू-सासरे यांची सेवा करायला पाहिजे कारण त्यांच्या आयुष्यातील श्रमांची आपण किंमत केली पाहिजे. कष्टाने संसार करून ते मुलांना मोठं करतात. लग्न करून देतात. तेव्हा सुनेकडून त्यांनाही अपेक्षा असतातच आपुलकीच्या, गोड प्रेमाच्या. तर प्रत्येक गोष्ट ही भावनांवर आधारित आहे. समाजातील सर्वच लोकांचे दुःखाचे कारण आपलं मन आहे. मनासारखंच घडावं असं प्रत्येकाला वाटतं, पण ते सर्वच शक्य नाही. कुठेतरी तडजोड करणे गरजेचे असते. आनंदी आयुष्य जगण्यासाठी तडजोड फार महत्त्वाची आहे. त्याचबरोबर प्रयत्न, मेहनत, इच्छा या गोष्टीही सुखी होण्यास मदत करतात. माणसातला स्वतःमधला मी गळून पडेल, तेव्हाच खरा सुखी होईल. कारण अहंकार द्वेषाला कारणीभूत ठरतो. म्हणून सर्वांच्या भावनांचा आदर ठेवायला हवा. आपण दुसर्‍याचा आदर ठेवला की, समोरचा ही आपला आदर ठेवतो. ही वस्तुस्थिती आहे.

 – सविता दरेकर

feelings

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

23 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

23 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

23 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

23 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

23 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

24 hours ago