संपादकीय

नको ती हिरोगिरी, उठेल कुणाच्या जीवावरी!

नवीन वर्षाची चाहूल लागली आणि त्यासोबतच पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत आणि त्यासाठी उडवला जाणारा पतंग आकाशात दिसायला लागला त्याक्षणी गेल्या वर्षीची नाशिकच्या तरुणाची घटना अंगावर अगदी शहारे आणून गेली. गेल्या वर्षीच्या संक्रांतीला गळ्यात नायलॉन माज्या अडकून युवकाची जी अवस्था झाली आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला, हे अतिशय दयनीय होतं. त्याला कारणीभूत असणारा नायलॉन मांजा आणि तो नायलॉन मांजा वापरून स्वतःला हीरो समजणारे युवक आहेत, आपण कितीही नाही म्हटलं, तरी त्या हत्येचे कारण आपणच आहोत.
मकरसंक्रांत म्हटली की, पतंग उडवण्याचा उत्साह आपल्यामध्ये आधीपासूनच आहे. तो असला पाहिजे, पण नायलॉन मांजा वापराने तर इतर काहीतरी भयानक, विदारक होत असेल तर खरंच तो वापरणे गरजेचे आहे का? का साध्या मांजाचा वापर करून देखील आपण पतंग उडवू शकतो ना. पण नाही आपल्याला अशा गोष्टी करण्यात रसच नसतो, ज्यात काहीतरी चुकीचं घडणारे, काहीतरी वेगळे घडणारे अशा गोष्टीच करायला आपल्याला आवडतात.
अशा घटनांनंतर नायलॉन मांजावर प्रतिबंध येऊनसुद्धा तो विकला जातो सर्रासपणे आणि घेणारादेखील घेतच असतो. विकणार्‍यावरच नाहीतर घेणार्‍यावरदेखील एक निर्बंध आणि काहीतरी कारवाई करण्यात येईल जेणेकरून याचा पूर्णतः वापर थांबवला जाईल. ही घटना तर एक मनुष्य म्हणून समोर आली. पण त्या मुक्या पक्ष्यांची काय चूक असते हो? कितीतरी पक्षी या मांजामध्ये अडकून मरून पडतात. का तर त्यांना बोलता येत नाही म्हणून. त्यांच्या जीवाची कोणी दखलच घेऊ नये का?
त्यातल्या त्यात काही लहान मुलं गच्चीवर त्या पतंगामागे धावताना पाय घसरून ते खाली पडून त्यांचा मृत्यूसुद्धा झालाय, तर काही विजेच्या तारांना चुकून हात लावून तिथेसुद्धा त्यांचा मृत्यू झालाय. या अशा घटना एखाद्या परिवारात घडणं किती मोठी हानी आहे, ज्या घरातली व्यक्ती जाते त्यांच्यासाठी ती संक्रांत खरंच आयुष्यभर कडूच राहणार. आपण इतके स्वार्थी का झालो आणि कसे झालो, या प्रश्नाचे उत्तर फक्त एकच गोष्ट देऊ शकते. ज्या गोष्टीवर निर्बंध असतात तीच गोष्ट आपल्याला करायची असते. आपण मनुष्यप्राणी आहात. सकलांचा विचार करणं आणि आपल्याही जीवाला जपणं, हे आपलं कर्तव्य.
आपले साधू-संत सांगून गेलेत, मुख्य जिव्हाळ असली तरी मळ आहे जीबी। त्यांना सांभाळणं त्यांच्या जीवाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य. आपली संस्कृती संक्रांतीला सांगते की, तीळगूळ घ्या गोड गोड बोला. तीळगूळ तर वाटतोच. आपणास गोड बोलणे जमले नाही तरी चालेल, पण कुणाच्या जीवावर ती संक्रांत उठणार नाही, याची दखल आपण या संक्रांतीला नक्की घेऊया. काहीच फरक पडत नाही, गॉगल लावा पतंग उडवा, सगळी मजा करा, पण कुणाच्या जीवावर उठणार नाही आपली ही संक्रांत याची काळजी नक्की घ्या.
कारण सण हे आनंद देण्यासाठी असतात. आनंद घेण्यासाठी असतात. कुणाच्या जीवावर उठण्यासाठी, कुणाला दुःखी करण्यासाठी नसतात. आणि हो आपण तर मनुष्यप्राणी आहोत. आपणच एकमेकांना जाणणार नाही, समजून घेणार नाही, तर कसे व्हायचे?
चला तर मग या मकर संक्रांतीला एक नवीन सुरुवात करूया साध्या मांजाचा वापर करूया. मुलांनाही साधाच माजा घेऊन देऊया. सणाचा आनंद लुटूया आणि असे केल्याने नक्की होईल सगळ्यांची आपल्यासोबत मकरसंक्रांत अगदी गोड गोड…

                                                                   – अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

22 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

22 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

22 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

22 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

22 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

22 hours ago