राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

फिफा विश्वचषकाच्या ’ट्रायोंडा’ फुटबॉलचे अनावरण

तंत्रज्ञान, डिझाइनचा अनोखा संगम; 11 जून रोजी उद्घाटन सोहळ्यात होणार वापर

मेक्सिको सिटी :
फिफा आणि अ‍ॅडिडास यांनी कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका या देशांमध्ये 11 जूनपासून संयुक्तपणे आयोजित होणार्‍या आगामी फिफा विश्वचषकासाठी ‘ट्रायोंडा’ या अधिकृत हाय-टेक फुटबॉलचे अनावरण केले आहे.
केवळ 4 पॅनेलची रचना आणि अत्याधुनिक इन-बिल्ट मायक्रोचिप तंत्रज्ञान असलेला हा चेंडू फुटबॉलच्या इतिहासातील एक मोठी क्रांती मानला जात आहे. या चेंडूचा पहिला अधिकृत वापर 11 जून रोजी मेक्सिको सिटी येथे होणार्‍या विश्वचषकाच्या उद्घाटनाच्या सामन्यात करण्यात येणार आहे.
‘ट्रायोंडा’ हा मूळ स्पॅनिश भाषेतील शब्द असून, त्याचा अर्थ ‘तीन लाटा’ असा होतो. 2026 च्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार्‍या कॅनडा, मेक्सिको आणि युनायटेड स्टेट्स (अमेरिका) या तीन देशांच्या एकतेचे हे प्रतीक आहे. या फुटबॉलच्या डिझाइनवर कॅनडाचे ‘मॅपल लीफ’, मेक्सिकोचा ‘गरुड’ आणि अमेरिकेचे ‘तारे’ यांचे सुंदर चित्रण करण्यात आले आहे. पांढर्‍या बेसवर लाल, हिरव्या आणि निळ्या रंगांच्या लाटा या तीन देशांच्या ध्वजांचे आणि संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात.

डिझाइनमधील क्रांती आणि अ‍ॅरोडायनॅमिक्स
अ‍ॅडिडासने जुन्या डिझाइन्सना मागे टाकत हा चेंडू केवळ चार मोठ्या पॅनेलमध्ये तयार केला आहे. सांधे कमी झाल्यामुळे हा चेंडू पूर्णपणे गोल झाला आहे. यामुळे हवेतील घर्षण कमी होऊन चेंडूचा वेग, स्थिरता आणि दिशा अधिक अचूक राहणार आहे. तसेच, चेंडूच्या बाहेरील सूक्ष्म नक्षीमुळे पावसाळी किंवा दमट हवामानातही खेळाडूंना चेंडूवर उत्तम नियंत्रण मिळवता येईल.

FIFA World Cup ‘Trionda’ football unveiled

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago