नाशिक

मालेगावच्या प्रश्नांवर संसदेत आवाज उठवणार

खासदार डॉ. बच्छाव; शासकीय विश्रामगृहात प्रलंबित विकासकामांचा आढावा

मालेगाव : प्रतिनिधी
आगामी लोकसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृहात विविध शासकीय विभागांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मतदारसंघातील विकासकामे, नागरिकांच्या तक्रारी, विशेष सघन पुनरावलोकन, जन्म दाखले, कायदा-सुव्यवस्था, पाणीपुरवठा आणि आरोग्य यांसह विविध पायाभूत सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. मालेगाव व धुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न आगामी संसदेच्या अधिवेशनात प्रभावीपणे मांडले जातील, असे आश्वासन खासदार डॉ. बच्छाव यांनी दिले.
बैठकीस अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, प्रांताधिकारी नितीन सदगीर, तहसीलदार विशाल सोनवणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद खैरनार, डॉ. दिनेश बच्छाव, युसूफ हाजी यांच्यासह एमपीसीएल, महावितरण, कृषी, पंचायत समिती, वनविभाग तसेच इतर विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलजीवन मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, ग्रामीण व शहरी रस्ते, शासकीय रुग्णालयांतील सुविधा, प्रधानमंत्री आवास, शबरी व रमाई आवास योजना यांसह केंद्र आणि राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध विकास प्रस्तावांचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. या बैठकीला मालेगाव शहर व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने
उपस्थित होते.

गाजणार्‍या बी-2 प्रश्नावर चर्चा

मालेगावात सध्या गाजत असलेल्या बी-2 प्रश्नावरही बैठकीत चर्चा झाली. 2005 पासून नागरिकांवर लागू असलेला हा कर रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन अ‍ॅड. भास्कर तिवारी, रमेश उचित, आशिष शहा, शरद खैरनार, सुधाकर कुलकर्णी, आबा बागडे, मयूर वांद्रे, अशोक जाधव आदींनी खासदार बच्छाव यांना दिले. हा प्रश्न लवकरच निकाली काढण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, जन्म नोंदणी आणि जन्म दाखला वितरण प्रक्रियेत कोणताही विलंब होऊ नये आणि नागरिकांना सुलभ सेवा मिळावी, अशा स्पष्ट सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या.

स्वतंत्र पोलीस आयुक्तालयावर चर्चा

मुख्य बैठकीनंतर खासदार डॉ. बच्छाव यांनी पोलीस प्रशासनासोबत स्वतंत्र बैठक घेतली. यामध्ये शहरातील कायदा-सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन, सीसीटीव्ही यंत्रणेचा विस्तार, नवीन नामपूर व ताहाराबाद पोलीस ठाणे तसेच मालेगावसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या आवश्यकतेवर चर्चा करण्यात आली.

 

Filth runs rampant in the Eklavyanagar area of ​​Manmad.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 hours ago