सिडको: विशेष प्रतिनिधी
शहरात कायदा सुव्यवस्था औषधा ला तरी उरली आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे, भर रस्त्यात कोयते घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या समाजकंटक पदोपदी आढळत असताना हे सर्व कमी म्हणून की काय आता भर रस्त्यात गोळीबार सारख्या घटना घडू लागल्या आहेत, सिडकोत काल मध्यरात्री पावणे बाराच्या सुमारास गॅंगवार मधून एकमेकांवर गोळीबार झाल्याची घटना घडली, मोटार सायकल वरून आलेल्या टोळक्याने गोळीबार केल्याने नागरिकांत खळबळ उडाली आहे, याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे, नाशिक मध्ये गेल्या काही दिवसांपासून टोळक्यांनी उच्छाद मांडला आहे. मोटार सायकल वरून रात्रीच्या वेळी जाताना आरडाओरड करणाऱ्या टवाळ खोरांनी पुरता उच्छाद मांडला असताना पोलीस यंत्रणा हातावर हात ठेवून आहे, रात्रीच्या गस्ती वाढवण्याची मागणी होत आहे.
सिडकोच्या त्रिमूर्ती चौकात दोन टोळ्यांमध्ये वाद झाला, हा वाद नंतर इतका वाढला की एकाने गावठी पिस्तुल मधून गोळीबार केला, तर काहींनी तलवार घेऊन दहशत निर्माण केली, यात गोळीचा नेम चुकल्याने एकजण वाचला, पण या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे, टोळी युद्धातून हा प्रकार झाल्याचे बोलले जात आहे,
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…