महाराष्ट्र

लेडीज टेलर दुकानाला आग सिंहस्थ नगर येथील घटना

लेडीज टेलर दुकानाला आग
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज
नाशिक प्रतिनिधी
नवीन नासिक सिहस्थ नगर येथील संजय राका चौकात हेतल लेडीज टेलर या दुकानाला (दि ७)पहाटे पावणे पाच च्या दरम्यान आग लागली. नवीन नाशिक सिडको या वसाहतीतील रोडवर असलेले हे दुकान नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रसंगावधान राखून तात्काळ विझवण्यात आली.

आगीत ग्राहकांचे शिवण्यासाठी  दिलेले कपडे आणी रेडीमेड कपडे तसेच दुकानातील इतर साहित्य जळून खाक झाले.इस्त्री चे बटन सुरू राहिल्याने शॉक सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे पहाटे साडेपाचच्या दरम्यान नागरिकांची वर्दळ सुरू असताना शेजाऱ्यांनी संबंधित दुकान मालकाला फोन करून आगीची सूचना दिली. त्यानंतर तात्काळ पोलिस आणि अग्निशामक दलाला पाचारण केले
नागरिकांनी घरातून पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कोणतेही जीवित हानी झाली नाही. नागरिकांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टाळला.

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

20 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

20 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

20 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

20 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

20 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

20 hours ago