कोचरगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच ग्रामस्थ जखमी

कोचरगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच ग्रामस्थ जखमी

दिंडोरी:  प्रतिनिधी
तालुक्यातील कोचरगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून त्यांना तातडीने नाशिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
वामन नाना लिलके हे पांडूरंग देसले यांच्या पडित क्षेत्रात शौचविधीसाठी गेले असतांना 9.30 वाजेच्या सुमारास झाडाझुडपात लपलेल्या बिबट्याने हल्ला करुन जखमी केले. त्यांचा आवाज ऐकून शेजारी शेतात काम करणारे व रस्त्याने जाणारे सोमनाथ केरु लिलके, विठ्ठल केरु लिलके, लहानू कचरु लिलके, लहानू पांडूरंग लिलके त्यांना वाचविण्यासाठी गेले असता यांना देखील बिबटयाने हातावर, मांडीवर चावा घेतला. पाठीवर पोटावर पंजाचे जखमा केल्या आहेत. जखमींना स्थानिकांनी तात्काळ कोचरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन उपचार दिले.  उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तेथे वनकर्मचारी यांनी दाखल झाले होते. उपचार सुरु असून जखमींची प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळाची सहाय्यक वनसंरक्षक संतोष सोनवणे, वनपरीक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अशोक काळे, वनरक्षक बागुल, वनरक्षक गांगोडे, वनसेवक पेलमहाले, शिरसाठ, जाधव, भुसारे, स्थानिक पोलिस पाटील लिलके, ग्रा.पं. सदस्य टोंगारे यांनी पाहणी करुन आजूबाजूचे शेतकरी, मजूर तसेच ग्रामस्थांना खबरदारीबाबत सूचना केल्या आहेत.  पडित शेत हे 10 ते 12 एकर असल्याने हल्ला करणारा बिबटे त्याच ठिकाणी लपल्याचे स्थानिक माहिती मिळाल्याने तेथे पिंजरा लावण्यात आला आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago