नाशिक

पूरपरिस्थिती नियंत्रणात, रामकुंड आणखी दोन दिवस बंद

नाशिक : प्रतिनिधी
गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पाणी साचणे आणि स्थानिक स्वरूपाचे नुकसान झाले असले, तरी प्रशासनाच्या तातडीच्या उपाययोजना, विविध यंत्रणांतील प्रभावी समन्वय आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. पावसाचा जोर कमी झाला असला तरी धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नसल्याने नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले, उपमहापौर विलास शिंदे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शनिवार आणि रविवारच्या सुट्यांमध्ये धबधबे, पर्यटनस्थळे आणि नदीकाठ परिसरात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाला प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Flood situation under control; Ramkund to remain closed for another two days.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

19 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

19 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

19 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

19 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

20 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

20 hours ago