एफडीए आयुक्त मुंढेंचा विशेष आराखडा
मुंबई :
सण-उत्सवात मोठ्या प्रमाणावर तयार करून वाटल्या जाणार्या अन्नपदार्थांच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेवर आता अन्न व औषध प्रशासनाची कडक नजर राहणार आहे. सणांच्या काळात होणारी अन्नभेसळ रोखण्यासाठी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वर्षभरासाठी विशेष कृती आराखडा केला आहे. प्रत्येक सणासाठी स्वतंत्र आदेश काढण्याऐवजी आता कायमस्वरूपी ‘स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स’ हा आदेश लागू केला आहे.
या आदेशानुसार विविध सणांच्या काळात अन्नसुरक्षेची यंत्रणा नियोजनबद्ध पद्धतीने सक्रिय राहणार आहे. सर्व धर्मीयांच्या प्रमुख सणांचा समावेश असलेला वर्षभराचा स्थायी आदेश प्रथमच जारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत सण सुरू झाल्यानंतर तपासणीला सुरुवात केली जात होती. मात्र, नव्या आराखड्यानुसार आता सणाच्या 21 दिवस आधीपासूनच ‘एफडीए’ची तयारी आणि तपासणी मोहीम सुरू होणार आहे. सण संपल्यानंतरही ही मोहीम आणखी 30 दिवस राहणार आहे.
पूर्वतयारी
सणाच्या काळात कोणत्या अन्नपदार्थांची मागणी वाढते आणि त्यापैकी कोणते पदार्थ आरोग्यासाठी अधिक धोकादायक ठरू शकतात, याचे मॅपिंग केले जाणार आहे. त्यासाठी विशेष पथके नियुक्त केली जातील. तसेच अन्ननमुन्यांची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळांना आधीच सूचना दिल्या जाणार आहेत.
पुरवठा साखळीवर लक्ष
अन्नपदार्थ तयार होण्यापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंतच्या संपूर्ण पुरवठा साखळीवर ‘एफडीए’ची नजर असेल. गिरण्या, घाऊक बाजारपेठा आणि अन्नपदार्थांची वाहतूक यांची तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर पहाटेच्या वेळेत विशेष नाकाबंदी व नाका तपासणीही केली जाईल.
सणाच्या दिवशी धडक कारवाई
महाप्रसाद, लंगर, भंडारे आणि मोठ्या प्रमाणावर अन्नवाटप होणार्या ठिकाणी भरारी पथकांकडून अचानक तपासणी केली जाणार आहे. अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, साठवणूक आणि तयार करण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली जाईल.
थेट कायदेशीर कारवाई
नियमांचे उल्लंघन करणार्यांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता आवश्यकतेनुसार गुन्हे दाखल करून न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
Food and *Prasad* to be checked during festivals and celebrations.
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…