नाशिक

अजमेरी बेकरीवर अन्न सुरक्षा विभागाची कारवाई

151 किलो अन्नपदार्थ जप्त

सिडको/नाशिक/ वडाळागाव : प्रतिनिधी
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक विभागाने ‘फेस्टिव्हल ड्राइव्ह-2026’ या विशेष मोहिमेंतर्गत भारतनगर येथील अजमेरी बेकरीवर कारवाई केली. तपासणीदरम्यान आवश्यक परवाना नसल्याचे आणि परिसरात अस्वच्छता आढळल्याने 151 किलो अन्नपदार्थ जप्त करण्यात आले.
भारतनगर, वडाळारोड, नाशिक पूर्व येथील मे. अजमेरी बेकरीची तपासणी करण्यात आली. यावेळी अन्न व्यवसायासाठी आवश्यक परवाना नसल्याचे तसेच उत्पादन आणि साठवणुकीच्या ठिकाणी अस्वच्छता असल्याचे आढळले. अन्न सुरक्षा नियमांचेही उल्लंघन होत असल्याचे तपासणीत निदर्शनास आले. त्यामुळे अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि सुरक्षिततेबाबत संशय निर्माण झाल्याने विभागाने कारवाई केली.
या कारवाईत 143 किलो केक आणि आठ किलो कपकेक असा एकूण 151 किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला. या अन्नपदार्थांची एकूण किंमत 47 हजार 990 रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी घेण्यात आले. उर्वरित साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. संबंधित आस्थापनेला व्यवसाय बंद करण्याची नोटीसही देण्यात आली.अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, नाशिक विभागाचे सहआयुक्त माने आणि सहायक आयुक्त (अन्न) व्ही. पी. धवड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील आणि संकेत येलमागे यांच्या पथकाने तपासणी केली.
सणासुदीच्या काळात मिठाई, बेकरी उत्पादने आणि अन्य खाद्यपदार्थांची मागणी वाढते. या काळात अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षा मानकांचे पालन यावर विभागाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. नागरिकांनी अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशय आल्यास लेाश्रिरळपीीं.ारहरषवर.ळप या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. अन्न व्यावसायिकांनी आवश्यक परवाने घेऊनच व्यवसाय करावा आणि अन्न सुरक्षा मानकांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Food Safety Department takes action against Ajmeri Bakery

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

9 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

9 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

9 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

9 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

9 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

9 hours ago