नाशिक

सिडकोत पहाटे पथदीप बंद

कालिका मातेच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

सिडको : प्रतिनिधी
नवरात्रोत्सवानिमित्त श्री कालिका मातेच्या दर्शनासाठी सिडको परिसरातून हजारो महिला आणि भाविक पहाटे तीन वाजल्यापासून मंदिराकडे जात आहेत. मात्र, परिसरातील रस्त्यांवरील दिवे पहाटे साडेपाच वाजताच बंद होत असल्याने अनेक ठिकाणी अंधार पसरतो. त्यामुळे दर्शनासाठी जाणार्‍या महिला, युवती आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवरात्रोत्सव संपेपर्यंत तरी पथदीप सकाळी साडेसहापर्यंत सुरू ठेवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जुने सिडको, सावरकर चौक, महाराणा प्रताप चौक, लेखानगर, छत्रपती शिवाजी चौक, खोडे मळा, वृंदावन कॉलनी आणि इच्छामणी कॉलनी परिसरातील प्रमुख रस्त्यांवर पहाटे पथदीप बंद होत असल्याने भाविकांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागत आहे. पहाटेच्या वेळी रस्त्यांवर वर्दळ कमी असल्याने महिला आणि युवतींना टवाळखोरांचा त्रास होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
नवरात्रोत्सवाच्या काळात पहाटेपासूनच भाविकांची मंदिराकडे जाण्यासाठी गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती व्यवस्था करावी. प्रमुख रस्त्यांवरील पथदीप सुरू ठेवण्याबरोबरच प्रकाश व्यवस्थेची नियमित तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नवरात्रोत्सवाच्या उर्वरित काळात तरी सकाळी साडेसहापर्यंत पथदीप सुरू ठेवून भाविकांना दिलासा द्यावा, अशी मागणी विजय कपिले, प्रसाद जाधव, सचिन बोरसे, वसंत लोखंडे, गणेश चिंचोरे, सुनील सोळुंकी, गणेश वझरे, नवनीत वझरे, रवी पवार, विशाल मुसळे, वाल्मिक बोरसे, प्रकाश ओगले, रवी जाधव आदींनी केली आहे.

Streetlights in CIDCO switched off at dawn

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

8 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

8 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

8 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

8 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

8 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

8 hours ago