दिंडोरी : प्रतिनिधी
शेतकर्यांच्या हिताला सदैव प्राधान्य देत कादवा सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात ऊस उत्पादकांना चांगला दर देण्याची परंपरा कायम राखली आहे. यापुढेही ही परंपरा अशीच सुरू राहणार असून, ऊस उत्पादक शेतकर्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करून ‘कादवा’लाच ऊस पुरवठा करावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले.
कादवा सहकारी साखर कारखान्याच्या 50 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा अन्न व नागरी पुरवठा मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून शेटे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, दत्तात्रेय पाटील, माणिकराव पाटील यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते.
जिल्ह्यात एकमेव सहकार तत्त्वावरील कारखाना यशस्वीपणे सुरू ठेवल्याबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संचालक मंडळाचे कौतुक केले. तसेच, कारखान्याच्या प्रगतीसाठी प्रशासकीय स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
श्रीराम शेटे यांनी सांगितले की, “कादवाने नेहमीच शेतकरीहिताला प्राधान्य देत वेळेत एफ.आर.पी. अदा केली आहे. कारखान्याचे विस्तारीकरण प्रगतीपथावर असून, लवकरच ते पूर्ण होऊन पूर्ण क्षमतेने गाळप सुरू होईल. यंदा कार्यक्षेत्रासह गेटकेन क्षेत्रात सुमारे 11 हजार हेक्टर उसाची नोंद झाली आहे. गळीत हंगामासाठी पुरेशा ऊसतोड कामगारांची भरती झाली असून, सर्व हंगामपूर्व तयारी पूर्ण झाली आहे.”
सोहळ्यास विविध मान्यवर, कारखान्याचे संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले. आभार संचालक सुखदेव जाधव यांनी मानले.
तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार : मंत्री झिरवाळ
आमदार अमोल मिटकरी यांनी कादवा कारखान्याचे कामकाज सहकार क्षेत्रासाठी आदर्शवत असल्याचे नमूद केले. तर, मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तालुक्यातील परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले की, “तालुक्यातील परिस्थिती लक्षात घेता लवकरच दुष्काळ जाहीर केला जाईल. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.“ तसेच शेती वाचवण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन करत, नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती लवकरच केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी दांपत्यांच्या हस्ते बॉयलर पूजन
या कार्यक्रमात मातेरेवाडी येथील राजेंद्र भास्कर खराटे, चिंचखेड येथील कैलास विश्वनाथ झेंडफळे, लखमापूर येथील मनोज अशोक दळवी, दिंडोरी येथील नितीन सुधाकर देशमुख आणि हातनोरे येथील अशोक पोपट बोरस्ते या ऊस उत्पादक शेतकर्यांच्या हस्ते सपत्नीक बॉयलर पूजन करण्यात आले.
‘Kadwa’ continues its tradition of offering the highest rates
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…