नाशिक

नांदूरशिंगोटेत एका रात्रीत तीन घरफोड्या

कडी-कोयंडे तोडून 1.31 लाखांचा ऐवज लंपास; एकाच टोळीचा संशय

सिन्नर : प्रतिनिधी
नांदूरशिंगोटे परिसरात चोरट्यांनी मध्यरात्री धुमाकूळ घालत अवघ्या काही तासांत तीन घरांमध्ये घरफोड्या केल्या. रोकड, सोन्याचे दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तूंसह सुमारे एक लाख 31 हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. एकाच रात्री सलग तीन ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांसमोर चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

नेहरू चौक परिसरातील भाऊसाहेब दत्तात्रय सोनवणे यांच्या बंगल्यात चोरट्यांनी वरच्या मजल्यावरील खोलीचे कडी-कोयंडे तोडून प्रवेश केला. घरातील सदस्य शेजारील खोलीत झोपलेले असतानाच कपाटातून 7 हजार रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली. चोरीपूर्वी घरातील इतर खोल्यांना बाहेरून कड्या लावण्यात आल्याचे आढळून आले.
मातंग वस्तीतील मुंगसे यांच्या घरात मागील दरवाजाचे कडी-कोयंडे तोडून प्रवेश करत चोरट्यांनी 35 हजार रुपयांची रोकड, 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, दोन सोन्याच्या अंगठ्या आणि सोन्याचे टॉप्स असा मोठा ऐवज लंपास केला. शिवाजी चौकातील आयुब नहरूद्दीन सय्यद यांचे घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी तेथेही चोरी केली. घरातील पाच हजार रुपयांची रोकड, घड्याळ, चांदीची चेन, अंगठी आणि काही नकली दागिने असा सुमारे 20 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. गुरुवारी दुपारी शेजार्‍यांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर चोरीचा प्रकार
उघडकीस आला.
तिन्ही ठिकाणी चोरी करण्याची पद्धत सारखीच असल्याने एकाच सराईत टोळीने हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मध्यरात्री 2 ते पहाटे 4 वाजेच्या दरम्यान या घरफोड्या झाल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच नांदूर पोलीस चौकीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून नाशिक येथून श्वानपथकाला पाचारण केले. मात्र, अद्याप कोणतेही ठोस धागेदोरे हाती लागले नसून, पोलीस उपनिरीक्षक पी. डी. सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Three house burglaries in one night in Nandurshingote

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

19 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

19 hours ago