नाशिक

माजी खासदार इम्तियाज जलील यांना टीसीएस प्रकरणात जामीन

सिडको : प्रतिनिधी
टीसीएस प्रकरणात एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांना नाशिक न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. दरम्यान, पीडित पक्षाच्या वतीने त्यांच्या जामीन अर्जाला विरोध करण्यात आला होता.
पीडित पक्षाचे वकील अ‍ॅड. मिलिंद कुरकुटे यांनी न्यायालयात जामीन अर्जावर आक्षेप नोंदविला. आरोपीविरोधात संभाजीनगर येथील पोलीस ठाण्यात यापूर्वी सात एफआयआर दाखल असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. आरोपी तपासात सहकार्य करणार नाहीत तसेच तपासासाठी उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याचे नमूद करीत जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी त्यांनी केली.
मात्र, सरकारी पक्ष, पीडित पक्ष आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने इम्तियाज जलील यांना 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला.
जामीन मिळाल्यानंतर माध्यमांशी बोलताना जलील म्हणाले, “माझा देशाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्वीपासूनच विश्वास आहे. न्यायालयाच्या आजच्या निर्णयातून त्याचा प्रत्यय आला. या प्रकरणात माझी नेमकी भूमिका काय होती, हे खटल्याच्या सुनावणीदरम्यान स्पष्ट होईल.”
लोकप्रतिनिधी म्हणून मदतीसाठी येणार्‍या व्यक्तीचा जात किंवा धर्म विचारला जात नाही. प्रत्येकाला शक्य ती मदत केली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले. निदा खान प्रकरणात धर्मांतराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असला, तरी आपण आणि आपला पक्ष धर्मांतरासारख्या विषयांवर विश्वास ठेवत नसल्याचेही त्यांनी सांगितले. विविध जाती-धर्मांचे लोक एकत्र राहणे, हीच भारताची खरी ताकद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
“माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आता आम्ही कायदेशीर लढा देऊ. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. आज जामीन मिळाला असून, खटल्याच्या सुनावणीनंतर सत्य समोर येईल,” असेही जलील म्हणाले. दरम्यान, वक्फ बोर्डाच्या नवीन नियमांबाबत विचारले असता, सध्या मला थोडा श्वास घेऊ द्या, इतर मुद्द्यांवर नंतर बोलेन, अशी प्रतिक्रिया
त्यांनी दिली.

Former MP Imtiaz Jaleel granted bail in TCS case

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

कॉलनी रस्त्यांचे घोडे अडले कुठे?

स्थायीत सदस्यांचा संताप; मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ : सभापती नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली नागरिकांना…

19 minutes ago

एसटी नाशिक विभागाचे दिवाळीत 25.67 कोटींचे उत्पन्न

दिवाळीची हंगामी भाडेवाढ न करताही विभागाच्या उत्पन्नात 1.35 कोटींची वाढ नाशिक : प्रतिनिधी यंदाच्या दिवाळी…

24 minutes ago

नाशिक झेडपी करवसुलीत अव्वल

बालके यंदा हक्काच्या लाभापासून वंचित; 2 कोटी 11 लाखांचा निधी वर्ग होणार नाशिक : प्रतिनिधी…

30 minutes ago

दुचाकींच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

साकोरा, वाखारी गावांवर शोककळा     नांदगाव : प्रतिनिधी नांदगाव-मालेगाव रस्त्यावर बुधवारी (दि. 18) रात्री…

45 minutes ago

मनपाच्या कचरा डंपरखाली चिरडून बालकाचा मृत्यू

संतप्त नातेवाइकांचे नुकसानभरपाईसाठी आंदोलन मालेगाव : प्रतिनिधी महापालिकेच्या कचरा संकलन करणार्‍या भरधाव डंपरच्या धडकेत सायकलस्वार…

50 minutes ago

‘व्हॉयेजर-1’ने रचला इतिहास; 49 वर्षांत 2,600 कोटी किमीचा प्रवास!

पृथ्वीपासून एक प्रकाश-दिन दूर पोहोचलेले पहिले मानवनिर्मित यान वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अवकाश संशोधनाच्या इतिहासात नासाच्या…

2 hours ago