नाशिक

एसटी नाशिक विभागाचे दिवाळीत 25.67 कोटींचे उत्पन्न

दिवाळीची हंगामी भाडेवाढ न करताही विभागाच्या उत्पन्नात 1.35 कोटींची वाढ

नाशिक : प्रतिनिधी
यंदाच्या दिवाळी हंगामात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नाशिक विभागाने प्रवासी वाहतुकीचा उच्चांक गाठत तब्बल 25 कोटी 67 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. या कालावधीत विभागातील 801 बसगाड्यांद्वारे 43.15 लाख किलोमीटरचा पल्ला गाठण्यात आला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 1.35 कोटी रुपयांचे अधिक उत्पन्न महामंडळाच्या तिजोरीत जमा
झाले आहे.
दिवाळीच्या सणात होणारी 15 टक्के भाडेवाढ राज्यातील दुष्काळाची परिस्थितीमुळे प्रवाशांवर आर्थिक भार पडू नये यासाठी रद्द करण्यात आली होती. प्रवाशांना नियमित तिकिटातच सणासुदीच्या काळात माहेरवाशिणी, कामगारवर्गासह विद्यार्थी तसेच भाविक प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन नाशिक विभागाने योग्य नियोजन केले होते.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 1.02 लाख किलोमीटर अधिक फेर्‍या चालवण्यात आल्या. विशेषतः नाशिक-पुणे मार्गावर धावणार्‍या सर्वच वातानुकूलित (एसी) बसेस 100 टक्के आरक्षित झाल्या होत्या. याशिवाय धुळे, नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगर या लांब पल्ल्याच्या मार्गांसह सप्तशृंगगड व त्र्यंबकेश्वर या धार्मिक स्थळांकडे जाणार्‍या मार्गांवरही प्रवासी आणि भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. प्रवाशांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांवरून जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
प्रादेशिक व्यवस्थापक, यंत्र अभियंता आणि विभागीय वाहतूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व आगार व्यवस्थापक, चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचार्‍यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे यश संपादन करता आले. प्रवाशांनी एसटी सेवेवर दाखवलेला विश्वास आणि कर्मचार्‍यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे नाशिक विभागाने यंदा विक्रमी कामगिरी केल्याचे नोंदविण्यात आल्याचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी सांगितले.

ST Nashik Division records revenue of Rs 25.67 crore during Diwali

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

कॉलनी रस्त्यांचे घोडे अडले कुठे?

स्थायीत सदस्यांचा संताप; मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ : सभापती नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली नागरिकांना…

19 minutes ago

नाशिक झेडपी करवसुलीत अव्वल

बालके यंदा हक्काच्या लाभापासून वंचित; 2 कोटी 11 लाखांचा निधी वर्ग होणार नाशिक : प्रतिनिधी…

30 minutes ago

दुचाकींच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

साकोरा, वाखारी गावांवर शोककळा     नांदगाव : प्रतिनिधी नांदगाव-मालेगाव रस्त्यावर बुधवारी (दि. 18) रात्री…

45 minutes ago

मनपाच्या कचरा डंपरखाली चिरडून बालकाचा मृत्यू

संतप्त नातेवाइकांचे नुकसानभरपाईसाठी आंदोलन मालेगाव : प्रतिनिधी महापालिकेच्या कचरा संकलन करणार्‍या भरधाव डंपरच्या धडकेत सायकलस्वार…

50 minutes ago

माजी खासदार इम्तियाज जलील यांना टीसीएस प्रकरणात जामीन

सिडको : प्रतिनिधी टीसीएस प्रकरणात एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांना नाशिक…

59 minutes ago

‘व्हॉयेजर-1’ने रचला इतिहास; 49 वर्षांत 2,600 कोटी किमीचा प्रवास!

पृथ्वीपासून एक प्रकाश-दिन दूर पोहोचलेले पहिले मानवनिर्मित यान वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अवकाश संशोधनाच्या इतिहासात नासाच्या…

2 hours ago