संतप्त नातेवाइकांचे नुकसानभरपाईसाठी आंदोलन
मालेगाव : प्रतिनिधी
महापालिकेच्या कचरा संकलन करणार्या भरधाव डंपरच्या धडकेत सायकलस्वार 12 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी मालेगाव शहरातील नवीन इस्लामपुरा परिसरात घडली. दस्तगीर अली सय्यद सईद असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी मृत बालकाच्या कुटुंबीयांना 20 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याच्या मागणीसाठी सामान्य रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले.
आयशानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करीम नाका ते पहलवान हॉटेलकडे जाणार्या रस्त्यावर बुधवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. महापालिकेचा कचरा वाहून नेणारा डंपर (एमएच 41 एई 3185) चालक गणेश छगन शेवाळे (31, रा. कृष्णा कॉलनी, कलेक्टरपट्टा) हा कचरा घेऊन जात असताना जहाँगीर बिल्डिंग मटेरियल दुकानासमोर त्याने डंपर भरधाव वेगात चालवून सायकलवरून जाणार्या दस्तगीर याला पाठीमागून धडक दिली. या अपघातात बालक डंपरच्या चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी सामान्य रुग्णालयात गर्दी केली. मृत बालकाच्या कुटुंबीयांना 20 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करत त्यांनी रुग्णालय परिसरात ठिय्या आंदोलन केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महापालिकेच्या कचरा संकलन वाहनांच्या वेगावर आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी सय्यद अकील सय्यद शब्बीर (45, रा. रमजानपुरा, टॉवरवाली) यांनी आयशानगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार डंपरचालक गणेश शेवाळे याच्याविरुद्ध अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Child crushed to death under municipal garbage dumper
स्थायीत सदस्यांचा संताप; मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ : सभापती नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली नागरिकांना…
दिवाळीची हंगामी भाडेवाढ न करताही विभागाच्या उत्पन्नात 1.35 कोटींची वाढ नाशिक : प्रतिनिधी यंदाच्या दिवाळी…
बालके यंदा हक्काच्या लाभापासून वंचित; 2 कोटी 11 लाखांचा निधी वर्ग होणार नाशिक : प्रतिनिधी…
साकोरा, वाखारी गावांवर शोककळा नांदगाव : प्रतिनिधी नांदगाव-मालेगाव रस्त्यावर बुधवारी (दि. 18) रात्री…
सिडको : प्रतिनिधी टीसीएस प्रकरणात एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांना नाशिक…
पृथ्वीपासून एक प्रकाश-दिन दूर पोहोचलेले पहिले मानवनिर्मित यान वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अवकाश संशोधनाच्या इतिहासात नासाच्या…