स्थायीत सदस्यांचा संताप; मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ : सभापती
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. नागरिकांना रस्त्यांवरून चालणे कठीण झाले आहे. साडेबाराशे कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता, त्याचे झाले काय? असा संतप्त सवाल सत्ताधारी सदस्यांनी स्थायी समितीत करत आपली खदखद व्यक्त केली. दरम्यान, या प्रश्नी येत्या चार-पाच दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कॉलनी रस्त्यांचा विषय मार्गी लावला जाईल, असे आश्वासन स्थायी सभापती मच्छिंद्र सानप यांनी सभागृहात सदस्यांना दिले.
महापालिकेत स्थायी समितीची सभा सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.19) पार पडली. यावेळी आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, नीलेश भदाणे, प्रदीप चौधरी आदींसह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी भाजप नगरसेविका दीपाली कुलकर्णी, शिवसेना नगरसेवक राहुल दिवे यांनी कॉलनी रस्त्यांच्या दुरवस्थेवरून प्रश्न उपस्थित केले. कित्येक दिवसांपासून कॉलनीतील रस्ते फोडून ठेवले असून, याचा ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप होतो आहे. या प्रकरणी नागरिकांची प्रचंड नाराजी आहे. शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी सांगितले की, याबाबतचा आराखडा तयार असून, तो महासभेच्या मंजुरीसाठी यापूर्वीच पाठवला आहे. दरम्यान, प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र आराखडा तयार केला आहे ना, असा सवाल सदस्यांनी केला असता, शहरातील सर्व 31 प्रभागांतील कॉलनी रस्त्यांसाठीचे प्रस्ताव सदस्यांकडून मागवण्यात आले होते. त्यानुसारच आराखडा तयार केल्याचे सांगितले. दरम्यान, नगरसेवकांची नाराजी दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कॉलनी रस्त्यांसाठी साडेबाराशे कोटींचा आराखडा तयार केला होता. परंतु, या आराखड्याचे घोडे अडले कुठे, असा सवाल स्थायी सदस्यांनी गुरुवारच्या सभेत केला.
या प्रश्नावर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक मुंबईला जाणार असल्याचे स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी सदस्यांना सांगितले.
छोट्या जाहिरातींसाठी नवी प्रणाली
सदस्यांनी शहरभर वायरींचे पसरलेले जाळे आणि झाडांवर लावलेल्या जाहिरातींतून महापालिकेला किती उत्पन्न मिळते, याची माहिती विचारली. तसेच यासाठी काही नियमावली आहे का? असा सवाल केला. प्रशासनाला समाधानकारक खुलासा देता न आल्याने सदस्यांनी आग्रही मागणी लावून धरल्याने सभापती सानप यांनी यासाठी नव्याने समिती नेमून स्वतंत्र कार्यप्रणाली तयार करण्याचा निर्णय घेतला.
जुन्या नाशिकच्या विकासाकडे दुर्लक्ष : पांडे
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर पंचवटीत जोरदार विकासाचे काम सुरू आहे, मात्र पंचवटीलाच लागून असलेल्या जुन्या नाशिकमध्ये मात्र वर्षानुवर्षे दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप नगरसेविका आदिती पांडे यांनी केला. मूलभूत सुविधादेखील या भागात नाहीत. अतिक्रमणाचा सदैव विळखाच पडला असून, या अतिक्रमणामुळे बाजारपेठांमध्ये नागरिकांना त्रास होत आहे. यशवंत मंडईचे काम कधी पूर्ण होणार, असाही सवाल उपस्थित केला.
Where exactly are the colony roads project stuck?
दिवाळीची हंगामी भाडेवाढ न करताही विभागाच्या उत्पन्नात 1.35 कोटींची वाढ नाशिक : प्रतिनिधी यंदाच्या दिवाळी…
बालके यंदा हक्काच्या लाभापासून वंचित; 2 कोटी 11 लाखांचा निधी वर्ग होणार नाशिक : प्रतिनिधी…
साकोरा, वाखारी गावांवर शोककळा नांदगाव : प्रतिनिधी नांदगाव-मालेगाव रस्त्यावर बुधवारी (दि. 18) रात्री…
संतप्त नातेवाइकांचे नुकसानभरपाईसाठी आंदोलन मालेगाव : प्रतिनिधी महापालिकेच्या कचरा संकलन करणार्या भरधाव डंपरच्या धडकेत सायकलस्वार…
सिडको : प्रतिनिधी टीसीएस प्रकरणात एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांना नाशिक…
पृथ्वीपासून एक प्रकाश-दिन दूर पोहोचलेले पहिले मानवनिर्मित यान वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अवकाश संशोधनाच्या इतिहासात नासाच्या…